श्रीमंतयोगी वाद्य पथकाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त वादकांचा सन्मान व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा
कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपल्या ढोल ताशांच्या लयबध्द ढोल ताशांच्या निनादाने प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमंतयोगी पथकाचा सातवा वर्धापन डी मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला यावेळी उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक वारसा जपणारे कुटुंब म्हणजे श्रीमंतयोगी वाद्यपथक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त करत श्रीमंतयोगी वादय पथकाच्या कार्याचा गौरव केला.
श्रीमंतयोगी वाद्य पथकच्या वतीने सालाबादप्रमाणे पथकातील वादकांचा सन्मान व दीनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी पथकातील वादकांच्या आई वडिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन , ढोल – ताशा पूजन तसेच ढोल ताशा वादकांचा व उपस्थितांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
श्रीमंतयोगी वादय पथकाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली असून पथकामध्ये कोरेगाव भिमा, आपटी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, फुलगाव, पेरणे, वाघोली, लोणीकंद ठिकाणाहून वादक येत असतात.पुण्यातील व मुंबई येथील गणेशोस्तवात पथकाने वादन केले असून ग्रामीण भागातील नामांकित व शिस्तबद्ध तसेच लयबद्ध ,नवनवीन तालबद्ध चाली वाजवणारे व आपल्या आवाजाने परिसर दुमदुमून सोडणारे पथक असा नावलौकिक आहे.
यावेळी संस्थापक सागर गव्हाणे पाटील, अध्यक्ष भानुदास ढेरंगे , उपाध्यक्ष प्रसाद देशमुख , घो. स. सा. कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे , कानिफनाथ चांगुलपई, प्राध्यापक अंजली , इंग्लिश मेडियम स्कुल सणसवाडी, जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश गव्हाणे , वढू बुद्रुक सोसायटीचे सचिव अनिल कुंभार, व वादकांचे पालक, पथकाचे सर्व पथक प्रमुख व वादक उपस्थित होते.