About us

आमच्या विषयी

स्वराज्य राष्ट्र हे दैनिक छञपती शिवाजी महाराज , स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज , मॉ साहेब जिजाऊ , राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासह भारत मातेच्या अनेक क्रांतिकारक , समाजसुधारक, देशसेवक, स्वातंत्र्यसेनानी, भूमिपुत्रांचा, अनेक ज्ञात अज्ञात विचारवंतांचा व अशा विविधांगी मान्यवरांच्या विचारांचा , भारतीय संस्कृती, जीवनपद्धती, समाज पद्धती याविषयी आदर ठेवत छत्रपतींच्या स्वराज्याचा विचार पुढे नेत एक सकारात्मक व विधायक वैचारिक मंथन व बदल घडवून आणण्यासाठी स्वराज्य राष्ट्र दैनिक नेहमीच निरपेक्ष काम करत राहणार आहे.

स्वराज्य राष्ट्र हे ग्रामीण भागातील दैनिक वृत्तपत्र असून या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरोच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बळकट करणे व समाजातील शोषित, वंचित व दुर्लक्षित घटकांचा आवाज होणे सत्याचा पुरस्कार तर असत्याचा धिक्कार करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सर्व समाजघटकांच्या जीवनातील घडामोडी, त्यांची शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व इतर महत्वपूर्ण शासकीय , निमशासकीय व खाजगी घटकांकडून असणारी अपेक्षा , त्यांच्या जीवनातील संघर्ष , त्यांच्यावर होणारा अन्याय ,अत्याचार यांना वाचा फोडण्याचे काम करत आहे.
समाजातील चांगल्या व प्रेरणादायी घटनांना प्राधान्याने प्रसिद्धी देत साजिक विचार मंथन घडवून आणणे,अनिष्ट व कालबाह्य असणाऱ्या व मानवी जीवनाला बंदिस्त करणाऱ्या व भारतीय राज्यघटनेने ज्या चुकीच्या व अयोग्य आहे अशा सर्वांचा निषेध व्यक्त करत समसमान बाजू मांडत विचार मंथन घडवून आणण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
संपादक उदयकांत ब्राम्हणे हे उच्च विद्याविभूषित असून प्रचंड वाचन, विविध विचारप्रवाह ,मत प्रवाह , सर्वधर्म समभाव याची अत्यंत काळजीने जपणूक करत, मानवता धर्मासाठी ज्या चांगले, अनुकरणीय, कायदेशीर व काल सुसंगत आहे त्याचा पुरस्कार करता. समाजासाठी काळानुरूप व वस्तुनिष्ठ लेखन करत, सर्वांगीण समाज घटकांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या लेखनात नावीन्यपूर्ण विचार मांडून वाचकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करत आहे.
वृत्तपत्रामध्ये प्रामुख्याने ताज्या बातम्यांच्या माध्यमातून घडलेल्या घटनांची सत्य ,वस्तुनिष्ठ व विश्वसनीय माहिती तातडीने वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात.राजकारण ,न्याय,शिक्षण,कृषी,साहित्य / सामाजिक, संपादकीय,स्थानिक वार्ता या माध्यमांतून विविध सामाजिक घटकांच्या बातम्या व वैचारिक लेखन वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असते.

अधिक माहितीसाठी संपर्क:

Address: Koregaon Bhima,

Pune Phone: +91-9860880393

Email: contact@swarajyarashtra.com