Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याकर्तबगार चारित्र्यवान मुले कशी घडवावी हे जिजाऊंच्या संस्कारातून शिकावे - सुनिता शिंदे

कर्तबगार चारित्र्यवान मुले कशी घडवावी हे जिजाऊंच्या संस्कारातून शिकावे – सुनिता शिंदे

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

पुणे – ज्या काळात अन्याय अत्याचार वाढले होते.रयत दु:खी होती.त्या काळात राजमाता जिजाऊंनी आपला पुत्र शिवबा वर असे संस्कार केले की एक कर्तबगार, चारित्र्यवान पुत्र घडवला.स्वराज्याला रयतेचे हित रक्षण करणारा छत्रपती दिले.लहानपणीच आई वारल्यामुळे शिवपुत्र संभाजी राजांवर संस्कार जिजाऊंनी केले.अशा रितीने आपल्या मार्गदर्शन व संस्काराने जिजाऊंनी स्वराज्यास दोन छत्रपती दिले..आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत हे राजमाता जिजाऊ चरित्रातून शिकावे असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.

सदर कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन साईधाम काॅलनी,चिंचवडेनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माणिक शिंदे , सूत्रसंचालन शितल घरत व आभार शालन घाटूळ यांनी मानले.

या प्रसंगी साधना शिंदे,सुनिता देशमुख,वनिता गायकवाड,धनश्री देशमुख, सुजाता सलगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माणिक शिंदे,शितल घरत,शालन घाटूळ,सविता अवचट,रेखा शिंगाडे,रंजना वाघमोडे,सतेजा मोरे,सरिता कोठावदे,रोहिणी काटकर,वैशाली मस्के यांनी केले होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!