Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाप्रत्येक खेळाडूने देशासाठी खेळायला पाहिजे - अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव

प्रत्येक खेळाडूने देशासाठी खेळायला पाहिजे – अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव

बीजेएस महाविद्यालयाचे २९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

वाघोली – आधुनिक काळात कोणत्याही खेळासाठी बौद्धिकता, लवचिकता आणि ताकद हे गुण महत्त्वाचे असून ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक खेळाडूने स्वतःसाठी, आर्थिक फायद्यासाठी न खेळता देशासाठी, राज्यासाठी व संघासाठी खेळत राहिले पाहिजेअसे अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी मत व्यक्त केले.

प्रसिद्ध लोकगीत गायक प्रदीप कांबळे यांनी ग्रामीण भागातील लोकप्रिय अनेक लोकगीता गायली आहेत. सुया घे पोत घे वाळू घे मनगटी घे हे लोकप्रिय लोकगीत गाऊन विद्यार्थ्यांना अधिक उत्साहित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी आजच्या तरुणांनी शैक्षणिक विकासाबरोबरच विविध कौशल्य आत्मसात करून त्याचा उपयोग आपल्या पुढील जीवनासाठी करणे आवश्यक आहे.

वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी स्वर्गीय संदीप सातव पाटील आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहेल हसनसाब तांबोळी, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार साक्षी रामचंद्र अडागळे यांना मिळाला. तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. सुभाष शिंदे आणि प्रा. संजय मानवतकर यांना मिळाला. तर आदर्श सेवक पुरस्कार बाळू सूर्यवंशी व दीक्षा धोत्रे यांना मिळाला. तर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षा, खेळ, एनसीसी, एनएसएस, मुक्त विद्यापीठ परीक्षा अशा विभागातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयात वर्षभर घेतलेल्या विविध उपक्रमात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय कार्याबद्दल प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. सचिन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे, वैशाली गायकवाड, प्राचार्य संतोष भंडारी प्राचार्य दिलीप देशमुख मुख्याध्यापक संजय गायकवाड, माजी विद्यार्थी कुसुम पांडे, अश्विनी भिसे, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण यांनी तर आभार डॉ. माधुरी देशमुख यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!