सणसवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा प्राथमिक शाळा वसेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली यावेळी अमोल काळूराम हरगुडे यांच्या मागील कार्यकाळात केलेल्या गुणवत्तापूर्ण कामाचा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेत बहुमताने निवड करण्यात आली.
जिल्हा प्राथमिक शाळा वसेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली यावेळी ग्राम पंचायत सदस्य व इतर मान्यवरांनी शाळेच्या अमोल हरगुडे व उपाध्यक्षपदी सोनाली पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल हरगुडे यांच्यावर उपस्थितांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.यावेळी सरपंच रुपाली दगडू दरेकर ,उपसरपंच राजेंद्र दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्या ललिता दरेकर, निकिता हरगुडे, उद्योजक नवनाथ हरगुडे व शालेय समितीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद मान्यवर उपस्थित होते.