Thursday, July 18, 2024
Homeक्राइमप्रेयसीने केला प्रियकराचा भोकसून खून

प्रेयसीने केला प्रियकराचा भोकसून खून

कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.हवेली) येथील एका बावीस वर्षीय युवकाच्या प्रेयसीने चाकूने भोकसुन खून करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

वाघोली  येथील यशवंत मुंढे ( वय २२) रा.लातूर याचा. चाकूने भोसून  प्रेयसीने खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते आज सकाळी पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियकराचा मृतदेह सापडला, या खुणा संदर्भात माहिती मिळताच लोणीकंद वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
  वाघोली मधील एका शैक्षणिक संस्थेमधील बॉईज हॉस्टेल मध्ये ही घटना घडली असून संबंधित तरुणी रात्रीच्या सुमारास बॉईज हॉस्टेलमध्ये कशी घुसली, हे मोठे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे, प्रेयसीने भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या छाती,पोटावर वार केल्याचे दिसून आले आहे यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला असून यशवंत महेश मुंढे (वय २२ वर्षे ) याचा मृत्यू झाला आहे, तर खून करणारी प्रेयसी अनुजा महेश पन्हाळे (राहणार अहमदनगर) असे खून करण्यात तरुणीचे नाव आहे, खून झालेल्या यशवंत मुंढे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!