Saturday, April 20, 2024
Homeकृषिबैलगाडा मालकाचा नादच खुळा...फॉर्च्युनर गाडी त्यात आणली घोडी....

बैलगाडा मालकाचा नादच खुळा…फॉर्च्युनर गाडी त्यात आणली घोडी….

शिरूर – शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या एका हौशी तरुणाने पाच महिन्यांची एक घोडी २५ हजाराना विकत घेतली. त्या घोडीला चक्क महागड्या असणाऱ्या फॉर्च्युनर कार मधून आणल्याने या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शेतकऱ्याचा नादच करायचा नाही हे एकदा दिसून आले आहे.

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीला अत्यंत महत्व आहे. बैलांचा खुराक, त्यांच्यावर केला जाणारा अफाट खर्च यामुळे बैलगाडा स्पर्धा व त्याच्याशी निगडित बैलगाडा, घोडी हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. स्पर्धेत जिंकणाऱ्या बैलांच जेव्हढे महत्व व कुतूहल आहे तेवढेच घोडीचेही महत्त्व आहे. बैलगाड्या पुढे पळताना घोडीला ठेवावेच लागते. कारण बैलांना रस्ता दाखवण्यासाठी आणि बैलांपेक्षा घोडीचा वेग अधिक असतो. त्यामुळे घोडीला देखील तेवढेच महत्त्व आहे.ढोक सांगवी येथील बैलगाडा शौकीन किरण दगडु पाचांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातून एक पाच महिन्यांची घोडी विकत घेतली. त्यांचा स्वतःचा बैलगाडा आहे. त्यामुळे गाड्याच्या पुढे धावण्यासाठी ही घोडी विकत घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे.

बैलापुढे घोडी पळण्याच्या दोन्ही बैलांना चाव-हेकरी म्हणतात. या बैलगाड्या पुढे बैलांना दिशा देण्याचं काम घोडी करत असते. ही घोडी खूप चपळ असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. घोडी मुळेच बैल शर्यती जिंकतो असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे अशी घोडी आपल्याकडे असावी असे प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटत असते. याच नादातून ढोक सांगवीच्या बैलगाडा मालकाने ही घोडी आणली आहे. हे घोडीचं लहान शिंगरू( पिल्लू ) आणून त्याची लहानपनापासून काळजी घेत तिला शर्यतीसाठी तयार केलं जातं. या परिसरात घाटात पळणाऱ्या बैलांना जशी लाखांची किंमत मिळते, तशीच घोडीला सुद्धा लाखो रुपयांची किंमत मिळते.मात्र त्यांनी फॉर्च्युनर गाडीतून तिला आणल्याने तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!