Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा वि.वि.का.स. सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल एकनाथ गव्हाणे यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भिमा वि.वि.का.स. सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल एकनाथ गव्हाणे यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी क्रमांक २ च्या चेअरमनपदी अनिल एकनाथ गव्हाणे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण साकोरे व दिपक वराळ यांनी काम पाहिले तर सचिव मधुकर कंद यांनी मदत केली.

कोरेगाव भिमा येथील सोसायटीचे चेअरमनपदी बिनविरोध निवड परंपरा कायम राहिली असून ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली. ठरलेल्या वेळेत राजीनामा देत इच्छुकांना काम करण्याची संधी देण्यात येत असून पदापेक्षा शब्दाला महत्व देत असल्याने सोसायटीची निवडणूक एक आदर्श बनली आहे.

 या निवड प्रसंगी डिंग्रजवाडीचे माजी उपसरपंच बारीकराव गव्हाणे,दत्तात्रय गव्हाणे,बापूसाहेब मल्हारी गव्हाणे, उद्योजक विकास गव्हाणे, माजी सरपंच भाऊसाहेब गव्हाणे, माजी चेअरमन नागेश गव्हाणे, व्हॉईस चेअरमन विमल शिंदे, माजी चेअरमन रमेश गव्हाणे, संभाजी गव्हाणे,संचालक प्रवीण गव्हाणे,मधुकर गव्हाणे, पांडुरंग आरगडे, साईनाथ गव्हाणे, डेप्युटी मॅनेजर शशिकांत गव्हाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनाखाली काम करणार असून शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्यात – नवनिर्वाचित चेअरमन अनिल एकनाथ गव्हाणे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!