Saturday, November 9, 2024
Homeक्राइमकोरेगाव भिमा येथील मटका धंद्यांवर पोलिसांचा छापा....

कोरेगाव भिमा येथील मटका धंद्यांवर पोलिसांचा छापा….

मटका चालकासह मालकावर गुन्हा दाखल

कोरेगाव भिमा (ता.शिरूर)  येथे १६ फेब्रुवारी रोजी सायं. ७:०५ वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या आदेशाने  कोरेगाव भिमा गावचे हददीत डिंग्रजवाडी फाटा येथे टायगर वॉर्डन बार जवळ कल्याण मटका नावाचा जुगार चालू असलेल्या खाजगी वाहनाने जात सदर ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला.

     यावेळीपोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, हेड कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी छापा टाकला असता काही इसम आपले जवळील असलेल्या कागदी बुकावर आकडे लिहून लोकाकडून पैसे घेवून जुगार खेळवित असताना मिळून आले त्यातील एकास  सिध्दार्थ मिलींद कांबळे (वय ३३ वर्षे रा. कोरेगावभिमा, गणेशनगर) त्याने  कैलास पाटील रा. वारजे माळवाडी, पुणे असे आम्ही दोघे जुगार मटका चालवित असलेचे सांगीतले. त्यांच्याकडून रोख रक्कम १९४० रुपये व पावती पुस्तके जप्त करण्यात आली.याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी तक्रार दिली आहे.

स्वराज्य राष्ट्र
साभार इंटरनेट

   अवैध धंद्यांचे मुळापासून उच्चाटन करण्यात येणार असून मटका चालक ,मालक व जागा मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत अवैध धंदे बंद करणारच असा निर्धार पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!