छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी आमदार रोहित पवार यांच्यासह इतर आमदार व नागरिकांचा आत्मक्लेश
कोरेगाव भीमा – दिनांक ३ डिसेंबर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून श्री क्षेत्र वढु बुद्रुक ( ता.शिरूर) येथील छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वारसा विचारांचा ,वसा महाराष्ट्राचा आत्मक्लेश करण्यासाठी व छत्रपतींच्या विचारांचे वारसदार म्हणून एकत्र येत आमदार रोहित पवार व इतर आमदारांसह नागरिकांनी एकत्र येत आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर पुष्पहार वाहत नतमस्तक झाल्यानंतर वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा व अस्मितेचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व इतरांचा निषेध व्यक्त करण्यात आला.अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार ,यासाठी ही बोलकी कृती मौन धारण करून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांच्यामार्फत संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश करण्यात आला यावेळी आमदार अशोक पवार,आमदार अमोल मिटकरी,आमदार अतुल बेनके,आमदार संदीप शिरसागर ,आमदार सुनील टिंगरे,आदर सुनील शेळके उपस्थित होते.
वाचण्यापेक्षा नाचण्यात तरुणाईला व्यस्त ठेवायचे आणि महापुरुषांना जाती जातीत विभागांत प्रयत्न करणे याविरोधात आत्मक्लेश आहे. यावेळी ऐतिहासिक संदर्भ देणाऱ्या आज्ञापत्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वाभिमानी व ज्वलंत इतिहासाचे दाखले देण्यात आले. यावेळी आपल्या शाहिरी आवाजाने
उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व पोवड्याच्या माध्यमातून विचारांचा जागर करणाऱ्या शाहीर कांबळे व सहकाऱ्यांनी अत्यंत मनोवेधक पोवाडा सादर . यावेळी आमदार रोहित पवार, आमदार ॲड अशोक पवार, ,आमदार अमोल मिटकर, आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, अतुल बेनके, नितीन पवार,संदीप क्षीरसागर, जयदेव गायकवाड ,प्रशांत जगताप,सूरज चव्हाण,संजय दौंड ,जयदेव गायकवाड, सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, मल्हारराव होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, जुनेद दुर्व्यानी, प्राजक्ता तनपुरे, माजी सभापती सुजता पवार, सभापती मोनिका हरगुडे,पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, माजी सरपंच स्नेहल भुजबळ, लोचन शिवले, सुरेखा भोरडे,वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, अंजली शिवले, संगीता सावंत, लाला तांबे, पप्पू आरगडे,माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,अंकुश शिवले, अनिल शिवले,माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे व ग्रामस्थांसह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचा अत्यंत चोख बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, शिरूर पोलीस स्टेशनचे सुरेशकुमार राऊत,रांजणगाव पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक व उप पोलीस निरीक्षक असा मोठा फौजफाटा होता.