राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना फक्त चालू बीलाचीच वसूली करा अन कुणाचेही कृषी वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अन त्यानुसार आदेश महावितरणने राज्यभर जारी केल्याची माहिती पुण्याचे माजी पालकमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
याच अनुषंगाने आदेश देण्यात आले ते असे की, कृषी ग्राहकांकडून एका चालू वीज देयकाचा (Current Bill Only) भरणा करुन घेण्यात यावा, या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय किंवा जास्तीच्या थकबाकी वसूली करिता सक्ती करण्यात येवू नये.सध्या कृषी वीज देयक वसुलीबाबतचे वेगवेगळे निकष, जसे एक चालू वीज देयक अथवा दोन चालू वीज देयके किंवा इतर अशाप्रकारे लावण्यात येत असल्यामुळे कृषी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.महावितरणने नवील आदेश देत त्याची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना महावितरण विभागाला दिल्या आहेत. याबाबत राज्यशासनाने सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, कोकण औरंगाबाद-पुणे-नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला आहे.