Thursday, April 25, 2024
Homeकृषिबळीराजाला शिंदे- फडणवीस सरकारकडून मोठा दिलासा : फक्त चालू महिन्याचे वीज बिल...

बळीराजाला शिंदे- फडणवीस सरकारकडून मोठा दिलासा : फक्त चालू महिन्याचे वीज बिल वसूल करण्याचे महावितरणला आदेश

पुणे ता.२३ नोव्हेंबर

राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना फक्त चालू बीलाचीच वसूली करा अन कुणाचेही कृषी वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अन त्यानुसार आदेश महावितरणने राज्यभर जारी केल्याची माहिती पुण्याचे माजी पालकमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांकडून वीज बिल थकल्याने महावितरणने कारवाईचा बडगा उगारत शेतीपंपाचे वीजजोड तोडण्याची मोहीम सुरु केली होती. अगोदर कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना राज्यभर शेतकरी त्रस्त आहेत अन त्यातच वीज बिल न भरल्याने शेतीच्या पंपाचे वीज जोड तोडण्यात येत होते. याबाबत पुण्याचे माजी पालकमंत्री बाळा भेगडे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबाबत विचार करून राज्यशासनाने चालू वीज बिल भरण्याबाबत आदेश दिले याबाबतीत माजी पालकमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्यातील बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती श्री भेगडे यांनी शिक्रापूरात दिली.

याच अनुषंगाने आदेश देण्यात आले ते असे की, कृषी ग्राहकांकडून एका चालू वीज देयकाचा (Current Bill Only) भरणा करुन घेण्यात यावा, या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय किंवा जास्तीच्या थकबाकी वसूली करिता सक्ती करण्यात येवू नये.सध्या कृषी वीज देयक वसुलीबाबतचे वेगवेगळे निकष, जसे एक चालू वीज देयक अथवा दोन चालू वीज देयके किंवा इतर अशाप्रकारे लावण्यात येत असल्यामुळे कृषी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.महावितरणने नवील आदेश देत त्याची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना महावितरण विभागाला दिल्या आहेत. याबाबत राज्यशासनाने सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, कोकण औरंगाबाद-पुणे-नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला आहे.

थकबाकी झालीय ४६ हजार…!
सप्टेंबर २०२२ अखेर कृषी ग्राहकांकडील एकूण थकबाकी रु. ४६०४७ कोटी झाली आहे. चालु आर्थिक वर्षात ग्राहकांकडून फक्त रु. २९७ कोटीचा भरणा करण्यात आला आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती विचारात घेता कृषी ग्राहकांनी किमान चालू वीज देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. सप्टेंबर तिमाहीसाठीची रु. १५१९ कोटीची चालू वीज देयके ग्राहकांना देण्यात आलेली आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!