Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?Upsc करणाऱ्या मुलाने वडिलांना यकृताचा भाग देत दिले जीवदान...

Upsc करणाऱ्या मुलाने वडिलांना यकृताचा भाग देत दिले जीवदान…

तुमच्या बाबांकडे फक्त एक महिना उरलाय, UPSC करणारा मुलगा परतला, बापमाणसाला जीवनदान

नांदेड – यकृत न बदलल्यास केवळ एका महिन्यापर्यंतच बाबा तग धरु शकतील, असं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यकृत कुठून आणायचं हा प्रश्न कुटुंबियांसमोर उभा असतानाच मुलाने तोडगा काढत स्वतःच्या यकृतातील काहिभग वडिलांना देत वडिलांचा जीव वाचवला असून तो आपल्या वडिलांसाठी आधुनिक श्रावण बाळ ठरला असून नांदेडच्या एका २५ वर्षीय डॉक्टर मुलाने फाटा दिला आहे. (Liver Donation )

वडील आणि मुलांच्या नात्यात रोजच दुरावा वाढत असणाऱ्या काळात,नांदेडमधील एका तरुणाने संपूर्ण समाजापुढे एक आदर्श उभा केले आहे.स्वतः एमबीबीएस डॉक्टर असलेल्या या तरुणाने आपल्या आजारी वडिलांसाठी आपले यकृत दान करून त्यांना जीवदान दिले आहे. डॉ मयुरेश गव्हाणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होतं असून वडिलांसाठी तो आधुनिक श्रावण बाळ ठरला आहे. (Upsc student donates liver to father)

नांदेड शहरातील रहिवासी असलेले डॉ मयुरेश गव्हाणे यांचे वडील गोविंद गव्हाणे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मयुरेश याने नांदेड मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केले असून दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत आहे. (Upsc student donates liver to father)

मागील काही दिवसा पासून त्यांचे वडील हे आजारी होते. त्यांना यकृतचा आजार होता. नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तात्काळ हैदराबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता यकृत पूर्णपणे खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.यकृत न बदलल्यास केवळ एका महिन्यापर्यंतचं ते तग धरु शकतील, असं तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगतिले. त्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. यकृत कुठून आणायचे हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला होता. (Liver Donation )

ही माहिती डॉ मयुरेशला मिळताच त्याने विलंब न करता थेट दिल्लीहून हैदराबाद गाठले आणि स्वतःच्या यकृताचा भाग दान करण्यास समर्थता दाखवली. डॉक्टरांनी देखील तपासणी करुन अवघ्या २४ तासात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली अन् यकृतातील काही भागाचे ट्रान्सप्लांट केले. संकट काळात मुलाने दिलेल्या आधारामुळे मनोहर गव्हाणे यांना जीवनदान मिळाले आहे. सध्या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नुकतीच ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे.(Upsc student donates liver to father)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!