Thursday, October 10, 2024
Homeक्राइमMpsc उत्तीर्ण दर्शना पवार (Darshana Pawar Murder Case) हत्येतील धक्कादायक थरार.....

Mpsc उत्तीर्ण दर्शना पवार (Darshana Pawar Murder Case) हत्येतील धक्कादायक थरार.. कटर ब्लेडने वार करत डोक्यात घातला दगड..!

दर्शनाचा पवार (Darshana Pawar)हिच्या निर्घृण खूनाची राहुलने हांडोरे कडून कबुली

पुणे : दर्शना पवार हत्याकांडात (Darshana Pawar Murder Case) थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे.खून झाल्यानंतर राहुल हंडोरे (Rahul Handore)याने नेमका खून कसा केला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून दर्शना पवार (Darshana Pawar) लग्नाच्या कारणाहुन त्यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यानंतर चिडलेल्या राहुलने रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपास मधील कटर ब्लेडने तीन ते चार शरीरावर वार केले. कटरचा वार गळ्याला लागल्याने तिचा रक्तस्त्राव सुरु झाला. आणि नंतर तिला दगडाने मारहाण करत तिचा खून केल्याची कबुली आरोपी राहुल हांडोरे याने दिली आहे, अशी माहिती पोलिस तपासत पुढे येत आहे. There was a loud argument between them due to marriage. An enraged Rahul then struck Darshan three to four times with the cutter blade from the Compass, initially in a fit of rage. She started bleeding as the cutter hit her neck. And later confessed to killing her by beating her with a stone

Shocking information in the murder of Darshana Pawar.

MPSC परीक्षेत राज्यात (State) तिसरा क्रमांक पटकावणारी दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरेच्या (Rahul Handore) अटकेनंतर या प्रकरणातील नवनवी माहिती आता समोर येत आहे. याच विषयी आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.
दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. १२ जूनला दोघेही राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून आले होते. असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. मात्र काही वेळानंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पहायला मिळत आहे. तिचे लग्न ठरले होते की नव्हते, तसेच सीसीटिव्ही बाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याने खून कसा केला याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी कडून सांगण्यात आले.Shocking information in the murder of Darshana Pawar.

दर्शना आणि राहूल एकमेकांना लहान पणापासून ओळखत होते. दोघेही पुण्यात Mpsc ची तयारी करीत होते. दर्शना हुशार असल्याने तिने Mpsc परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पहिल्याच प्रयत्नात राज्यात तिसरी आली होती. वन आधिकारी (Forest Officer) म्हणून काही दिवसात कामावृ रुजू होणार होती. मात्र राहुल याला परीक्षेत अपयश येत होते. तो डिलिव्हरी बॉय चे पार्ट टाईम काम करायचा आणि इतर वेळी Mpsc चा अभ्यास करत होता.

Shocking information in the murder of Darshana Pawar.
राहुल याला व्हायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार – (Rahul wanted to be an officer turned criminal)
हुशार डोक्याचा वापर अधिकारी होण्याऐवजी गुन्हेगारी लपण्यास उपयोग. दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने पुण्यातून पळ काढला, तो वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान त्याने रेल्वेने प्रवास केला. पुण्यातून तो सर्वात आधी सांगलीत गेला. त्यानंतर तेथून त्याने गोवा गाठलं. त्यानंतर तो थेट चंदीगडला पोहोचला. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.

यावेळी राहुलने पोलिसांपासून कसं लपायचं याची सारी तयारी केली होती. त्याने त्याचा मोबाईल पूर्णवेळ बंद ठेवला होता, जेणेकरुन पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळू नये. जेव्हा गरज असेल तेव्हा तो नातेवाईक-मित्रांना फोन करायचा. पण, यावेळी त्याने खबरदारी घेतली. त्याने आपल्या फोनवरुन एकही फोन केला नाही. तर, प्रवासात सहप्रवाशांकडून फोन घेऊन त्याने संपर्क साधला. यादरम्यान, त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन केले. तो प्रवासात सहप्रवाशांच्या फोनवरुन तो कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना फोन करायचा. संपर्क झाल्यानंतर तो लगेच आपलं ठिकाण बदलायचा. जेणेकरुन पोलिसांना मिसलीड करता येईल आणि पोलिसांना त्याचं खरं लोकेशन कळणार नाही, याची काळजी राहुल हांडोरे सातत्याने घेत होता.

Mpsc करणाऱ्या मुलामुलींना जवळीकता साधताना विचार करूनच पाऊल टाकायला हवे – अनेक मुल – मुली एम पी एस सी ( Mpsc) करत अधिकारी होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत पुण्यात पोहचतात. अभ्यासिका ,क्लास, अभ्यास, सतत एका ध्येयाचा पाठलाग करत इतर सर्व गोष्टींचा त्याग करतायत मात्र थोड्याच कालावधीत वाढणाऱ्या वयाबरोबर स्वप्नाळूपणा मागे पडून वास्तवाचे चटके सुरु होतात . अशात जर यातील कोणी प्रेमात पडलं तर वगेळीच गुंतागुंत सुरु होते . दोघांपैकी एकजण परीक्षा उत्तीर्ण झाला तर ही गुंतागुंत आणखीनच वाढते . अनेकदा ही नाती अधुरी एक कहाणी ठरतात . दर्शना आणि राहुलच्या प्रकरणातून या एम पी एस सी करणाऱ्या मुला – मुलींनी हाच धडा घ्यायचाय की आपण कोणाशी जवळीक साधण्याची व आपले स्वप्न,ध्येय, कुटुंबीयांची आपल्याविषयी असणारे स्वप्न व आयुष्याचा दर्जा याविषयी विचार करून आपले पाऊल चुकू न देता अधिकारी व्हायला हवे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!