Wednesday, September 11, 2024
Homeक्राइमMpsc उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या चारित्र्यावर व्यक्त होण्याआधी हे जाणून घ्यायला हवे....

Mpsc उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या चारित्र्यावर व्यक्त होण्याआधी हे जाणून घ्यायला हवे….

Mpsc उत्तीर्ण दर्शना पवार संवेदनशील , हुशार, समजदार, भक्कम, कणखर, घरची जाण असणारी, आई-वडिलांची चिंता असून तिला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते – ह. भ. प. सचिन पवार

सोशल मीडियातून दर्शनावरही काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. या पोस्ट वाचून दर्शनाच्या संघर्षाच्या काळात तिला मार्गदर्शन करणारे ह.भ.प. सचिन पवार यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावत यश मिळवणाऱ्या दर्शना पवार या कोपरगाव तालुक्यातील तरुणीचा काही दिवसांपूर्वी पुण्यातील राजगडावर खून करण्यात आला. दर्शना (Darshana pawar) हिचा खून तिचा मित्र सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे याने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकातून बुधवारी रात्री ताब्यात घेतले. लग्नाला नकार दिल्याने दर्शनाचा खून केल्याची कबुली राहुलने दिली आहे. मात्र या प्रकरणात सोशल मीडियातून दर्शनावरही काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. या पोस्ट वाचून दर्शनाच्या संघर्षाच्या काळात तिला मार्गदर्शन करणारे ह.भ.प. सचिन पवार यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mpsc passed Darshana Pawar Sensitive, intelligent, understanding, strong, tough, homely, worried about her parents and wanted to do something for them – Sachin Pawar
दर्शनाच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांबद्दल चीड व्यक्त करत सचिन पवार यांनी लिहिलं आहे की, ‘दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्यासोबतच दर्शनाविषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हुशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडिलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती. अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रीनशॉट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पाहा,’ असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

सचिन पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहितात की, ‘स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झाल्यावर दर्शनाला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता. रोज ज्ञानेश्वरी वाचायची. त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकिंगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं, हेही चुकीचं नाही. इथंपर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहुलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहुलमधील नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहुलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा? आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे.पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्टी वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे,’ अशा शब्दांत सचिन पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Mpsc passed Darshana Pawar Sensitive, intelligent, understanding, strong, tough, homely, worried about her parents and wanted to do something for them – Sachin Pawar

दर्शनाने सचिन पवारांना पाठवलेल्या मेलमध्ये काय म्हटलंय?
सचिन पवार यांची मार्गदर्शनपर भेट घेतल्यानंतर त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये दर्शनाने आपला जीवनविषयक दृष्टीकोन आणि त्यामध्ये झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं होतं. याच ईमेलचा स्क्रीनशॉट सचिन पवार यांनी शेअर केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ‘मी आधी फक्त माझ्या करिअरवर फोकस केला होता. पण तुमच्या भेटीनंतर मी आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन शिकले. आयुष्य खूप सुंदर आणि साधेपणाने जगता येऊ शकतं, असं मला वाटतं. तुम्ही दिलेलं एक उदाहरण खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपली लूट हे कोणी वरिष्ठ स्तरावरील लोक करत नाहीत, तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेणारे पीएसआय स्तरावरील अधिकारीच करतात. हे सत्य असलं तरी ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक समस्यांपासून मी आधी पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. पण या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे, हे तुमच्यामुळे माझ्या लक्षात आलं,’ असं दर्शनाने सचिन पवार यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/100001361605134/posts/pfbid036pjuWzfRoP9LMxjr8gWyj6dMB3S5yVVRRYhCvP7DDL9Q1fePUztR8iBRUQ9seia6l/?app=fbl


कु. दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्या सोबतच दर्शना विषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हूशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती. अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रिनशाॅट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पहा. निवड झाल्यावर तिला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता. रोज ज्ञानेश्वरी वाचायची.

त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकींगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं हे ही चुकीचं नाही. इथं पर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहूलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहूल मधला नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहूलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा ?

आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे. पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्टी वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे.दर्शनाला भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏

अशा भावना व्यक्त करून दर्शना पवार हिच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करत समाज माध्यमांवर तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असून खरच आपण सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करायलाच हवा…..

Mpsc passed Darshana Pawar Sensitive, intelligent, understanding, strong, tough, homely, worried about her parents and wanted to do something for them – Sachin Pawar

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!