Monday, May 13, 2024
Homeक्राइमहवेली तालुक्यातील थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्यासह दोघांवर लाचलुचपत विभागाची कारवाई

हवेली तालुक्यातील थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्यासह दोघांवर लाचलुचपत विभागाची कारवाई

कोरेगाव भिमा – थेऊर (ता.हवेली) आजीच्या आईच्या वडीलांची नोंद मंजुर करण्यासाठी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणुन व सात बाऱ्यावर नोंद करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना खाजगी ईसम विजय नाईकनवरे व योगेश तातळे यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

     तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांचे नावे कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे येथे असलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उता-यावरील नाव कमी झाल्याचे दिसुन आल्याने, त्या नावाची नोंद पुर्नः स्थापीत करण्यासाठी तक्रारदार यांची आजी व तिच्या बहिणींनी मा. तहसिलदार, हवेली, पुणे यांचेकडे रितसर अर्ज केला होता. सदर अर्जावर तहसिलदार हवेली यांनी, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या वडीलांच्या नावाची ७/१२ उता-यावर नोंद करण्यासाठी गाव कामगार तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी थेऊर यांना आदेश दिले होते. सदरबाबत गावकामगार तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीप्रमाणे ती नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार हे मंडल अधिकारी थेऊर कार्यालय येथे लोकसेविका जयश्री कवडे यांना भेटले असता, लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी इसम विजय नाईकनवरे यास भेटण्यास सांगितले असता नाईकनवरे याने  तक्रारदाराकडे फेरफार नोंदीप्रमाणे आजीच्या आईच्या वडीलांची नोंद मंजुर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्या करीता दहा हजार रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, मंडल अधिकारी कार्यालय, थेऊर कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तक्रारदार यांची आजीच्या आईच्या वडीलांचे नावाची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांचेकरीता तडजोडीअंती सात हजार रुपयाची लाच रकमेची मागणी केली व त्यास योगेश तातळे यांनी दुजोरा दिल्याने, खाजगी इसम  विजय नाईकनवरे यांनी  सात हजार रुपयाची लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली व लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी इसम तातळे व  नाईकनवरे याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणुन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे याना ताब्यात घेण्यात आले असून, त्या

तिघांविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक  अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!