Wednesday, October 9, 2024
Homeक्राइमBreaking News.. शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले...

Breaking News.. शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी

शिरूर – शिरूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार राजेंद्र गवारे यांनी तक्रारदार व त्यांचे मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाणे येथे दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागणी करत तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहाथ पकडले असून यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.(Anti Curruption Bureau Pune)

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ६५ वर्षीय तक्रारदार व त्यांचे मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाणे येथे दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी लोकसेवक सहाय्यक फौजदार राजेंद्र दगडू गवारे (वय ५३ वर्ष ,सहायक पोलीस फौजदार, नेमणूक -शिरूर पोलीस स्टेशन ,पुणें.) यांच्याकडून होत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. (Pune Gramin Police)

सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक २० डिसेंबर रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे वरील काम करून देण्यासाठी तडजोड़ी अंती १०,०००/- रुपये सहाय्यक फौजदार राजेंद्र गवारे ह्यानी लाच मागणी करून सदर लाचेची रक्कम तहसीलदार कचेरी कार्यालयाचे समोरील हॉटेल मित्रधन मध्ये, पंचा समक्ष स्वीकारल्यावर लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.(Shirur Police Station)

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे ,पोलिस शिपाई आशिष डावकर, चालक पो. हवा. काकडे यांनी केली.(Anti Curruption Bureau Pune)

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडूनसर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी कार्यालय क्र. 020 26132802ईमेल dyspacbpune@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!