Monday, November 4, 2024
Homeताज्या बातम्याAmol kolhe on Ajit pawar तुम्ही चूक केली असेल तर मला पक्षात...

Amol kolhe on Ajit pawar तुम्ही चूक केली असेल तर मला पक्षात घेण्यासाठी दहा – दहा वेळा निरोप पाठवण्याचे व लपून छापून भेटी गाठीचे कारण काय होते? खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

शिरूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली,असं अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी देखील अजित पवार यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले देत त्याबाबत आपल्या एक्स अकाऊंट वरून पोस्ट केली आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रश्नाला व त्यांच्या टीकेला मी उत्तर देणे हे उचित नाही. परंतु त्यांनी जे वैयक्तिक आक्षेप घेतले आहेत ते योग्य नाहीत. सेलिब्रिटी उमेदवाराबद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. परंतु मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देतो आपण ज्या उमेदवरांची नावं सेलिब्रिटी म्हणून सांगितली आहेत, त्यातील एकालाही संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिलेले प्रत्युत्तर मला निवडून आणून जर तुम्ही चूक केली असेल तर मला पक्षात घेण्यासाठी दहा – दहा वेळा निरोप पाठवण्याचे व लपून छापून भेटी गाठीचे कारण काय होते? पवार साहेबांनी संधी दिली आणि आजही मी शरद पवार साहेबांसोबत प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे.

मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे आणि मी केलेल्या कामामुळे पहिल्याच टर्मला तब्बल तीन वेळा मला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. असा उमेदवार देऊन चूक केली म्हणात, मग याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या चुकीची कबुली स्वत: देत आहात. मी आपल्याकडे राजीनाम्याबाबत बोललो असं तुम्ही वारंवार सांगत आहात, पण मग मी संसदेत प्रश्न उपस्थित करणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत बोलंण सोडून दिलं होतं का? मी संसदेत उपस्थित नव्हतो का असा सवालही यावेळी अमोल कोल्हे यांनी केला आहे.

तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला” – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) ‘एक्स’ अकाउंटवर व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही, असं मी कायम बोलत आलो आहे. पण, अजित पवारांच्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यातील एकाही खासदारास संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं मी ऐकलं नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळाला आहे,” असं कोल्हे म्हणाले.

https://x.com/kolhe_amol/status/1764592237076439444?s=20

तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी –शिरुर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेचे प्रश्न मांडत असताना तब्बल पहिल्याच टर्ममध्ये मला तिन वेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला. माझ्याकडे राजीनामा देणार असल्याचे बोलून दाखवले, असं अजित पवार म्हणाले. पण जर राजीनामा देण्याच्या विचारात होतो तर संसदेत उपस्थित नव्हतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणे सोडलं होतं का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील खासदाराची कामगिरी तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही रेकॉर्ड आपण तपासून पाहावे. 

शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना मीच राबवत होतो – अमोल कोल्हे यापुढे बोलताना माझा त्यांना सवाल आहे की, ही जर चूक होती तर मला पक्षात ये यासाठी दाहा वेळा आमंत्रण कशाला पाठवली? शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना मीच राबवत होतो. विधानसभेच्या प्रचारात देखील आपण एकत्र होतो. तुमची शिखर बँक प्रकरणात चौकशी सुरु असताना देखील आम्ही ही यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने पूर्ण केली. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!