कोरेगाव भीमा – आपटी ( ता.शिरूर)
आयुष्यामध्ये सद्संगतीने मानवाच्या जीवनाचा उद्धार घडतो, संगत चुकली आयुष्याचा दर्जा घसरतो संताच्या संगतीने उत्तम मार्ग मिळतो. अहंकार आला की भगवंत प्राप्ती होत नाही. देव ज्यांच्या अंतःकरणात बसतो त्यांच्याकडून समाजाची विधायक कामे होत असतात तसेच त्याचे आयुष्य व जगणे आदर्श असतेच पण त्याच्या सहवासाने परिसराचे मंदिर होते.
संतांच्या सहवासात राहिल्याने भक्त शेवटी संगविहीन होतो. त्याचे सर्व भ्रम , व्यर्थ विचार, चुकीच्या समजुती , दृश्यातल्या वस्तुंविषयी च्या अभिलाषा, भोगांच्य़ा इच्छा ह्या सर्वांपासून तो वेगळा होतो. त्याच्यावर ह्या सर्वाचा परिणाम होत नाही. मन स्वतंत्र वासनारहित होते. ते भगवंतावर स्थिर होते. निश्चल तत्वावर स्थिर होते व ह्यामुळे भक्ताला देहामधे असतानाच मुक्ती मिळते.
यावेळी संत कबीर यांच्या भक्तीचे उदाहरण देत कमाल यांच्या संत सेवा करताना आपले प्राण दिले पण संतसेवा नाही सोडली या उदाहरणाने उपस्थितांचे डोळे पाणावले तर संत चमत्काराचा दाखला देताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
माणसं देवाला गर्भात असल्यापासून देवाला मागणे मागत असतात. एक वेळा करी या दुखः वेगळे या अभंगाच्या चरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत आपल्या अभंगात माणसाने मागणारा नव्हे तर देणारा असावाअसा भावार्थ सांगितला.संत तुकाराम महाराज यांचे वैराग्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चैतन्य तर कर्णाचे ओदार्य आहे. देव बोलतो तेंव्हा भगवद्गीता होते असे ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती यांनी सांगितले.
आपटी येथे श्री बाळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे अखंडपणे २७ वे वर्ष आहे. दिनांक ६ एप्रिल ते १३ एप्रिल या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आपटी ग्रामस्थ , अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व बाळ भैरवनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी कीर्तन, प्रवचन, भजन, जागर, हरिपाठ नित्यनेमाने करण्यात आले.कीर्तनाला आपटी परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गायनाची साथ काळूराम महाराज घेनंद, सुभाष महाराज देशमुख , गोरक्ष महाराज दौंडकर यांनी पेटी वादनाची साथ गोसावी बापू , विक्रम गोसावी, माऊली बोरगे यांच्यासह आळंदी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट टाळांची साथसंगत केली.
यावेळी बाजीराव शिवले, साहेबराव शिवले, काळुराम महाराज घेनंद, कोरेगाव भीमाचे रावसाहेब फडतरे , वढू बुद्रुक प्रसिद्ध मृदुंगसेवक ओमकार महाराज यशवंत, नितीन गव्हाणे,मल्हारी चौधरी, उत्तम गव्हाणे यांच्यासह कोरेगाव भिमा पंच क्रोशीतील भविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी साध्वी वैष्णवी यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे तरुणांकडून संभाजी महाराजांची उत्कृष्ट सेवा केली जाते. कोरेगाव भीमा येथील तरुणांनी उत्कृष्ट रामायण कथेचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते.