Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रदेशातील पहिली महिला सहकारी बँक असलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक...

देशातील पहिली महिला सहकारी बँक असलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या राजमाता पॅनेलची प्रचारात आघाडी

कोरेगाव भीमा – पन्नासाव्या वर्षात यशस्वी वाटचाल करणाऱ्या व देशातील पहिली महिला सहकारी बँक असलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारात बँकेच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांच्या राजमाता पॅनेलने जोरदार आघाडी घेतली आहे.

सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा पाठिंबा – भारती सहकारी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब कड, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाढवे, ज्येष्ठ व संपादक भालचंद्र कुलकर्णी, बँकिंग तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी आज राजमाता पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला.राजमाता पॅनेलला सिंहगड, पुणे, शिरूर भागासह सर्व ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चाकण विभागात आमदार दिलीप मोहिते यांनी पाठिंबा दिला. तसेच ते राजमाता पॅनेलच्या प्रचारात सहभागी झाले होते.

उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत बँकेला पन्नास वर्षांच्या वाटचालीत पाठबळ देणाऱ्या ज्येष्ठ सभासदांशी संवाद साधला. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राजमाता पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वास राजमाता पॅनेलचे प्रचार प्रमुख व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार व कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार अशोक पवार यांनीही आज शिरुर नगररोड परिसरात उमेदवारांसह झंझावाती प्रचार केला. आमदार पवार म्हणाले, ‘बँकेच्या विद्यमान अध्यक्षा, उपाध्यक्षा व संचालकांच्या पारदर्शक कारभारामुळे शहरी व ग्रामीण भागातील खातेदार, ठेवीदार, ग्राहकांत विश्वासार्हता वाढली आहे. उत्कृष्ट कार्याबद्दल बँकेने राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. त्यामुळे मतदारांचे राजमाता पॅनेलला मोठे पाठबळ मिळत आहे.’पॅनेलच्या उमेदवार व विद्यमान अध्यक्षा स्मिता यादव, उमेदवार विद्यमान उपाध्यक्षा रेखा पोकळे, उमेदवार सत्वशीला शिरोळे, निता मोहिते, वसुंधरा उबाळे, शिल्पा खंडेलवाल, सुषमा साळुंखे, शितल गरुड, सुनीता दरेकर, संगीता खळदकर, रमेश पहाड, आनंद कळके, उत्तम सोनवणे यांनी मतदारांशी संवाद साधला. त्या वेळी ठिकठिकाणी त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, मतदार, नागरिकांनी स्वागत केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!