Saturday, May 18, 2024
Homeइतरशिरूर तालुक्यात माजी सभापती सुजाता पवार यांचा रामकृष्ण हरी.. वाजवा तुतारीचा प्रचार...

शिरूर तालुक्यात माजी सभापती सुजाता पवार यांचा रामकृष्ण हरी.. वाजवा तुतारीचा प्रचार जोरात…

तीव्र उन्हाच्या झळांत प्रचार मात्र जोरात, आमदार पत्नी व माजी सभापती सुजाता पवारांचा लक्षवेधी प्रचार 

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे माजी सभापती सुजाता पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरू असून कोरेगाव भिमातील नागरिक, रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात प्रचार करत असून रामकृष्ण हरी… वाजवा तुतारी अशा घोषणा देत भर उन्हात प्रचार सुरू आहे.

यावेळी कोरेगाव भिमा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेत तीव्र उन्हाच्या झळांना न जुमानता उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार करत असून यामध्ये आमदार अशोक पवार यांच्या पत्नी वाजी सभापती सुजाता पवार यांचा प्रचार मात्र चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

  यावेळी कोरेगाव भिमा येथील मारुती मंदिर, मुख्य चौक, वढू बुद्रुक चौक, व्यापारी , कामगार ,शेतकर ,रिक्षा चालक, महिला भगिनी, मतदार व नागरिक यांच्याशी संवाद साधण्यात आला

 डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या भेटी दरम्यान कोरेगाव भिमा येथील प्रचारामध्ये कोरेगाव भीमाचे माजी पंचायत समिती सदस्य पि के अण्णा गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे,माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, सुनील गव्हाणे, माजी संचालक महादेव फडतरे, उद्योजक रवींद्र फडतरे, उद्योजक ज्ञानेश्वर फडतरे, ग्राम पंचायत सदस्या रेखा तानाजी ढेरंगे, माजी ग्राम पंचायत सदस्या मीना ढेरंगे, अंजली ढेरंगे, कुंदा फडतरे, बच्चु गव्हाणे, दिपक फडतरे, अमोल गव्हाणे, प्रवीण खलसे व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!