Thursday, November 21, 2024
Homeइतरभीषन अपघात.. केसनंद जवळ इको व कंटेनरच्या अपघातात सात जण जखमी.. दोघांची...

भीषन अपघात.. केसनंद जवळ इको व कंटेनरच्या अपघातात सात जण जखमी.. दोघांची प्रकृती चिंताजनक

जखमींना १ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लोणीकंद पोलीस व स्थानिकांनी काढले बाहेर

जोगेश्वरी मंदिरा समोरील वळण सरळ करा अन्यथा आंदोलन करणार – चंद्रकांत वारघडे 

कोरेगाव भिमा – लोणीकंद – थेऊर रस्त्यावर केसनंद हद्दीत जोगेश्वरी माता मंदिराच्या जवळ मोठ्या लेलंद व इको गाडीचा भीषण अपघात झाला असून इको गाडीचा चकनाचुर झाला असून दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाले असून पाच जण जखमी आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी लोणीकंद पोलीस व स्थानिकांना १ तास अथक प्रयत्न करून बाहेर काढले आहे.

     केसनंद हद्दीत जोगेश्वरी मंदिरसमोरील वळणाला  इको (एम एच १४ जी एच ४०२७)  व मालवाहतूक कन्टेनर समोरा समोर जोरदार धडक झाल्याने इको गाडीचा अक्षरशः चकनाचुर झाला.अपघाताची तीव्रता खूप मोठी होती. लोणिकंद पोलिस व स्थानिक तरुणांनी १ तास प्रयत्न करुन अडकलेल्या नागरीकांना काढले बाहेर इको गाडीत एकूण ७ जन होते पैकी काहीची गंभीर परिस्थिती आहे.यातील रांजणगाव – कारेगाव येथील कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यावेळी स्थानिक नागरिकांनी, प्रवाशी व विषेस्तः माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी अपघातग्रस्तांची मोलाची मदत केली.

वळण सरळ करा..अन्यथा आंदोलन करणार – चंद्रकांत वारघडे 
जोगेश्वरी मंदिरा समोर एक खुप मोठे वळण आहे शेजारी वनविभागाने संरक्षक जाळी लावल्यामुळे ते वळण अजून तिव्र झाले आहे. सदर रस्त्याचे काम चालू असताना माहिती सेवा समितीचे माध्यमातून अनेक वेळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वळण सरळ करण्याबाबत विनंती केली परंतु त्यांचे आडमुठ्या भूमिकेमुळे वळण सरळ न केल्याने अनेक  अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. प्रवशांच्या जीवाशी होणारा खेळ तातडीने थांबवण्यात यावा व वळण सरळ करण्यासाठी  पुन्हा एकदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे अन्यथा माहिती सेवा समितीचे माध्यमातून त्याच ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रकांत वारघडे यांनी दिला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!