Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याभरसभेत अजित पवारांनी पकडले कान..धरणाच्या वक्तव्याने माझं वाटोळं झाल

भरसभेत अजित पवारांनी पकडले कान..धरणाच्या वक्तव्याने माझं वाटोळं झाल

कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाथाळपणा लावलाय. हे लपून रहात नाही

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा व कामाच्या पद्धतीमुळे सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत.असाच एक गमतीदार अनुभव शिर्सुफळ येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार  सभेत बोलताना आपल्याला सहज बोलून गेलेल्या विधानांमुळे कसा फटका बसला हे सांगत सारखं मेंदुला सांगत असतो नीट बोलायचं, नीट बोलायचं. असे सांगत पुन्हा एकदा आपल्या परखड स्पष्टवक्तेपणा सांगितला.

कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा – कार्यकर्ते आता माझ्या सभेला आलेत, मला दिसण्यासाठी पुढे पुढे करतील आणि मी गेलो की दुसऱ्यांच्या सभेला जातील. कुंकु लावायचं असेल तर एकाचं लावा. माझं तरी लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय चाथाळपणा लावलाय. हे लपून रहात नाही असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला.

धरणाच्या वक्तव्याचा उल्लेख आणि सर्वत्र हशा – अजित पवार यांनी त्यांच्या धरणाबद्दलच्या वादग्रस्त विधानाचाही उल्लेख केला. अजित पवार म्हणाले की, काही झाकून राहत नाही. मी निंबोरीत असंच बोललो. घोंगडी बैठक होती. तिथं आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता तिथं काय करावं का, धरणात. पण माझं वाटोळं झालं, परत कानाला खडाच लावला. सारखं मेंदुला सांगत असतो नीट बोलायचं, नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊ द्यायचा नाही द्यायचा नाही,माणूस चुकतो, जो काम करतो तो चुकतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही.

सुनेला द्यायचं की मुलीला द्यायचं – आताच्या निवडणुकीत साहेब नाहीत आणि मी पण नाही त्यामुळे ४० वर्षापूर्वी बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं की मुलीला द्यायचं हे बघा. सुनेला मान असतो, तर सासू थोडे दिवसांनी तिच्याच हातात चाव्या देतात, चुकलं तर सुनेला सांगते. आईच्या पोटातून कुणीच शिकून येत नाही. रस्ते माहिती नव्हते, पण केलं ना. आज भावनिक होऊ नका असंही अजित पवार म्हणाले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!