Saturday, May 18, 2024
Homeक्राइमपुण्यात...बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासूच्या दुचाकीला पेटवल्याने आगीत १५ दुचाकी गाड्या...

पुण्यात…बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासूच्या दुचाकीला पेटवल्याने आगीत १५ दुचाकी गाड्या जळाल्या 

पुणे – बायकोशी झालेल्या वादानंतर एका तरुणाने सासूची गाडी दुचाकी पेटवली तिची आग इतर १४ गाड्यांना लागल्याने एकूण १५ गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर असलेल्या गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) असे गाड्या पेटवणाऱ्या जावयाचे नाव आहे.

याबाबत ४२  वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) रा. विठ्ठल मंदिराजवळ, उत्तमनगर, पुणे याच्यावर  गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि त्याच्या पत्नीसोबत वाद आहेत. याच वादाच्या रागातून आरोपी बुधवारी दुपारी सासुरवाडीत आला. गणेश दहिभाते याने बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली फिर्यादी यांची ज्युपिटर गाडी पेटवून दिली. यामुळे दुचाकी शेजारी पार्क केलेल्या इतर १४ दुचाकींनी पेट घेतला. यात फिर्यादी व इतर १४ अशा एकूण १५ दुचाकी जळून नुकसान झाले आहे. सदर घटना वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा इमारती समोरील पार्किंग मधील ही घटना आहे. संबधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करीत आहेत. (Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्रसिंह क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभायस, पोलीस उपनिरीक्षक मालुसरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, या धक्कादायक घटनेने सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या जाळपोळ प्रकरणी आरोपी गणेश दिनकर दहिभाते याच्यावर सिंहगड रोड पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!