पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या प्रत्येक सदस्याने वैयक्तिक वर्गणी काढत गावामध्ये महिला भगिनिंसाठी राबवला अभिनव उपक्रम,बक्षिसांची लयलूट पैठणी, सहभागी प्रत्येक महिला भगिनीला मिल्टन पाण्याची बॉटल बक्षीस
कोरेगाव भीमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथे जागतिक महिला दिनानिमित्त खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.यावेळी महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विजेत्या महिलांना पैठानिसह विविध बक्षिसे व सहभागी प्रत्येक महिला भगिनीला मिल्टन पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी महिला भगिनींनी आयोजकांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वारावर रेखाटण्यात आलेली सप्तरंगी आकर्षक रांगोळी, विविध पारंपरिक वेशात आलेल्या माता भगिनी,लहान मुले , पदाधिकारी महिला भगिनींना बांधण्यात आलेले फेटे, घेण्यात आलेल्या विविध खेळांमुळे खेळ रंगला पैठणीचा अत्यंत उत्साहात पार पडला.सोबत नृत्यांगनाचे बहारदार लावणीवर मनमोहक नृत्य तर महिला भगिनी व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व ग्राम पंचायत सदस्य यांनी महिला भगीनिंसाठी वर्गणी काढून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सादरीकरण निर्मात महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार गणेश रणदिवे यांनी केले.
यावेळी पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे उपसरपंच रेश्मा कुसेकर , ग्राम पंचायत सदस्या शुभांगी शेळके,अनिता दौंडकर ,दिपाली तांबे,सुनिता बेंडभर,पंडित थिटे, सागर शितोळे,संदीप जगताप,अशोक वाडेकर, ग्रामसेवक रवींद्र शिंदे यावेळी उपस्थित होते.
पिंपळे जगताप हे शेतीप्रधान गाव आहे. माता भगिनी गाई,गोठा,शेती व घरकाम करत कुटुंबातील कामाला प्राधान्य देणाऱ्या असल्याने त्यांच्या दैंनदिन जीवनात आनंद मिळावा त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी मिळावी तसेच महिलांनी एकत्र यावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.- सरपंच सोनल अशोक नाईकनवरे, उपसरपंच रेश्मा कुसेकर