डिंग्रजवाडी(ता.शिरूर) येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा व छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असा भक्तिशक्ती सोहळा ज्योत आणणे, पारंपारिक वाद्य मिरवणूक तसेच कीर्तन व शिवजयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सर्व डिंग्रजवाडी ग्रामस्थांच्या २७ मार्च रोजी माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे सुश्राव्य शिव कीर्तन झाले.त्यांनी तुकोबा रायांचे जीवन चरित्र व विठ्ठलभक्ती याविषयी सुंदर निरूपण केले तर २८ मार्च महिला भगिनींनी शिवजन्माचा पाळणा गात शिवजन्मोत्सव साजरा केला. गावातील तरुणांनी पुण्यातील लाल महाल येथून शिवज्योत आणली तिची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून शिवज्योतीचे पूजन ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सायंकाळी प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान झाले. सह्याद्री ढोल ताशा पथक दिघी यांच्या वाद्यांच्या निनादत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्यदिव्य अशी मिरवणूक आबालवृद्धांच्या सहभागाने जल्लोषात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी आभार प्रदर्शन सरपंच यशवंत गव्हाणे यांनी मानले.
२७ व २८ मार्च रोजी संयोजन समिती व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दोन दिवसांचा भक्तिशक्ती असा उत्सव साजरा करण्यात आला.