पोलिस चोरांना पकडण्यासाठी गेले असताना चोरांनी मिळून पोलिसालाच विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचले. पोलिसाची प्रकृती बिघडत गेल्यानंतर उपचारादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार (रा. ठाणे) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली.पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
याबाबत घडलेली घटना अशी की, दिनांक २८ एप्रिल रोजी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार लोकल रेल्वेने सिव्हील कपड्यात ड्युटीवर जात होते त्यावेळी ट्रेन माटुंगा आणि सायन परिसरात रात्री साडेनऊ वाजता स्लो झाली तेव्हा प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर मारले.
विशाल पवार यांच्या हातातून फोन निसटला आणि तो फोन उचलून चोर पळाले. लोकल स्लो असल्याने विशाल पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. पण काही अंतरावर चोरांच्या साथीदारांनी त्यांनाच घेरले. विशाल पवार यांनी विरोध करताच त्यांना मारहाण केली. यावेळी मागून कुणीतरी विशाल पवार यांना चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी त्यांना विषारी द्रव्याचं इंजेक्शन दिल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत होती. तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.