Monday, May 13, 2024
Homeक्राइमकोरेगाव भीमा येथे चोरट्यांनी शोरुमचे मेन षटर उचटकावून दोन स्प्लेंडर गाड्यांसह एक...

कोरेगाव भीमा येथे चोरट्यांनी शोरुमचे मेन षटर उचटकावून दोन स्प्लेंडर गाड्यांसह एक लाख पाच हजार रुपये केले लंपास

एकूण १,८५,६८३ रुपयांची चोरी

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील डिंग्रजवाडी फाट्यावर असणाऱ्या  हिरो कंपनीच्या विघ्नहर्ता मोटर्स  शोरुम  मधून शोरुमचे मेन षटर उचटकावून दोन स्प्लेंडर गाड्यांसह एक लाख पाच हजार रुपयांची रक्कम पळवल्याचा धाकडायक प्रकार घडला आहे.

याबाबत शिक्रापूर प्लिज स्टेशन येथे प्रशांत सुर्यकांत झोडगे, (वय ३७ वर्षे) , व्यवसाय शोरुम रा. पाबळयांनी फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेली माहिती नुसार २५ एप्रिल रोजी भागवत पवार यांनी शोरुमच्या मेन गेटला कुलूप लावून गेले होते २६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तीन चोरांनी चोरी केली.त्यातील एकाने काळे कपडे व तोंडाला काळया रंगाच्या फडक्याने गुंडाळलेले एकाने भगव्या रंगाचा जॅकेट घालत चोरट्यांनी मेन शटर उघडले व  ड्राव्हरमध्ये असलेली  १,०५,६८३ रोख रक्कमेसह हिरो कंपनीच्या नवीन दोन  स्प्लेंडर मोटार सायकल चेसिस क्र.MBLHAW224R5CO3185,  इंजिन क्रमांक HA11E7R5C62251 Asc. व (२) काळ्या रंगाची हिरो कंपनी स्प्लेंडर मोटार सायकल चेसिस क्र.MBLHAW220R5C85710,  इंजिन क्रमांक HA11E7R5C02369 S.No.चोरीस गेल्या असून एकूण १,८५,६८३ हजार रुपयांची चोरी झाली आहे.(#Crime News)

  शोरुम मधील सी सी टी व्ही फुटेज मध्ये चोर चोरी करताना दिसत असून याबाबत अधिकचा तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश थोरात करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!