Thursday, July 25, 2024
Homeक्रीडा३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता (गोवा) महीला, ग्रिकोरोमन व फ्रीस्टाईलचा महाराष्ट्र कुस्ती संघ...

३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता (गोवा) महीला, ग्रिकोरोमन व फ्रीस्टाईलचा महाराष्ट्र कुस्ती संघ जाहीर 

लोणीकंद पुणे येथे ग्रिकोरोमन , महीला व फ्रीस्टाईल या ३ विभागामध्ये महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी संपन्न 

   पुणे – दिनांक २५ आक्टोंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान  गोवा येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती महासंघावरील असलेल्या अस्थाई समितीच्या सूचनेनुसार दीनांक ७ व ८ आक्टोंबर रोजी जाणता राजा कुस्ती केंद्र , लोणीकंद पुणे येथे ग्रिकोरोमन , महीला व फ्रीस्टाईल या ३ विभागामध्ये महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी संपन्न झाली.

    या निवड चाचणीमध्ये अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या होऊन खालील कुस्ती संघ निवडला गेला.

फ्रीस्टाईल संघ – ५७ कीलो – अमोल बोंगार्डे ( कोल्हापूर),७४ कीलो – सौरभ पाटील ( कोल्हापूर),८६ कीलो – ओंकार जाधवराव ( पुणे ) ,९७ कीलो – पृथ्वीराज पाटील ( कोल्हापूर ) 

ग्रिकोरोमन कुस्ती संघ – ६० कीलो – प्रविण पांडुरंग पाटील ( कोल्हापूर) , ६७ कीलो – योगेश रमेश चंदेल ( संभाजीनगर) ,७७ कीलो – सुशांत साहेबराव पालवे ( सोलापूर) , ९७ कीलो – रोहीत संजीवकुमार अहीरे ( नाशिक)१३० कीलो – गणेश उमाजी जाधव ( सातारा )

महीला कुस्ती संघ – ५० कीलो – नंदीनी साळुंखे ( कोल्हापूर), ५३ कीलो – धनश्री फंड ( अहमदनगर) , ५७ कीलो – सोनाली मंडलिक ( अहमदनगर) ,६२ कीलो – भाग्यश्री फंड ( अहमदनगर), ६८ कीलो – प्रतिक्षा बागडी (सांगली ) , ७६ कीलो – अमृता पुजारी ( कोल्हापूर )

      या कुस्ती निवड चाचणीस पिं.चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री हनुमंत गावडे , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे , सरचिटणीस व हिंदकेसरी पै.योगेश दोडके ,  पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पै.पांडुरंग खानेकर , सहकार्याध्यक्ष पै. मेघराज कटके , भारतीय शैली राज्य कुस्ती संघटनेचे सरचिटणीस पै.मोहन खोपडे ,  पै.नवनाथ घुले ,  उपमहाराष्ट्र केसरी  पै.रविंद्र पाटील , पै.संतोष माचुत्रे , पै.ज्ञानेश्वर मांगडे , पै. कृष्णा फीरंगे , राजाभाऊ जाधव,  पै.मारुती सातव , पै. शरद कचरे , पै. अविनाश टकले , पंच तुषार गोळे , काळुराम लोंखडे,  राजेंद्र वरे , हेमंत शितोळे ,  निलेश भगत , धोडींबा पाबळे , मोहन मानकर , राहुल हरगुडे ,  संध्या पानबुडे , शैला धुमाळ ,  विश्वनाथ जांभुळकर,  एनआयएस कोच पै.संतोष भुजबळ ,  कोच सागर मारकड , कोच नितेश काबलिए ऑफीस सेक्रेटरी सागर भोंडवे हे उपस्थित होते तसेच जाणता राजा कुस्ती केंद्राच्या वतीने पै.सचिन पलांडे , पै.उमेश वरपे , पै.लोखंडे यांनी निवड चाचणी करीता चांगली व्यवस्था उपलब्ध करुन दीली

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!