Saturday, September 14, 2024
Homeस्थानिक वार्ता२४ वर्षीय तरुणीच हृदयविकराच्या झटक्याने निधन

२४ वर्षीय तरुणीच हृदयविकराच्या झटक्याने निधन

निधनाची वार्ता समजताच परिसरावर शोककळा

कोरेगाव भीमा – दिनांक ७ जुलै तुळापूर ( ता.हवेली) येथील रविना दशरथ शिवले या २४ वर्षीय तरुणीच हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. रविना शिवले यांच्या निधनाची वार्ता काळताच तुळापूर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

रविना दशरथ शिवले या तरुणीच्या पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने पिपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अवघ्या २४ व्या वयाच्या तरुणीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे कळताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत तरुणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

रविना शिवले ही कुटुंबाची कर्ती मुलगी होती. शिवले कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असून तिच्या निधनाने शिवले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे . तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार असून कुटूंबातील एकमेव कमवती व्यक्ती होती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!