Saturday, July 27, 2024
Homeइतरहोळीचा गाव येथील प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मोठ्या उत्साहात संपन्न

होळीचा गाव येथील प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मोठ्या उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांसह पालकांचा उस्फुर्त सहभाग

शाळापूर्व मेळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवर

मिलिंदा पवार वडूज सातारा
होलीचा – जिल्हापरीषद प्राथमिक शाळा होलीचा गाव येथे शाळापूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व असे वाजतगाजत स्वागत करण्यात येऊन ,विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षरातील आकर्षक नावाचे मुकुट घालण्यात आले होते.शाळापूर्व तयारी मेळाव्याचा बोर्ड लावण्यात आला. तसेच आकर्षक रांगोळी , ढोल, ताशा ,झांज वाजवत सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी गावातून प्रभात फेरी काढन्यात आली होती.मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षां मार्फत कण्यात आले.
मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यय हणमंत मोहीते व उपाध्यक्ष अमोल जगताप व माता, पालक तसेच जून २०२२ मध्ये पहिलीत येणारे नवीन विदयार्थी यांची उपस्थिती होती.उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब जाधव , शिंदे बंडोबा , आनंदराव सरगर ज्ञानदेव पांडुरंग लावंड मनीषा अनिल आणि अंगणवाडी मोहिते सुनंदा मॅडम आणि शैला सावंत मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, स्वयंसेवक,उपस्थित होते

या अभियानाअंतर्गत साध्य करावयाची उद्दिष्टे –
१) मागील दोन वर्षात झालेले शै क्षणिक नुकसान भरून काढणे
२) इयत्ता १ली त २०२२ दाखल होणाऱ्या विदयार्थ्यांची तयारी करून घेणे
३) शिकवण्यासाठी प्रेरित करण्याकरिता स्वतः साक्षर असले पाहिजे हे गरजेचे नाही हे पालकांना कसे समजावणे
४) NEP 2020 अंमलबजावणीस प्रारंभ
वरिल उददीष्टये साध्य करण्यासाठी शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे सात काऊंटर्स लावले जातात. प्रत्येक काउंटरवर मुलांना करण्यासाठी विविध एक्टिविटीज असतात. मुलांच्या माताना एक रिपोर्ट कार्ड दिले जाते. त्याला विकासपत्र म्हणतात तसेच स्वयंसेवकांमार्फत १२ आठवडे यांचा पाठपुरावा करून विदयार्थ्या कडून सर्व कृतीपत्रिका सोडवून घेणे आवश्यक असते. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसरा मेळावा याच पद्धतीने घेणे आवश्यक असते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!