Friday, July 12, 2024
Homeइतरहृदयद्रावक.... आजारी आज्जीला पाहण्यासाठी आलेल्या नातवाच्या हृदयविकाराने मृत्यूनंतर आजीनेही दोन तासात ...

हृदयद्रावक…. आजारी आज्जीला पाहण्यासाठी आलेल्या नातवाच्या हृदयविकाराने मृत्यूनंतर आजीनेही दोन तासात सोडले प्राण…

आजीची विचारपूस करायला आलेल्या नातवावर घराची पायरी चढतानाच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यूरुपी काळाने घाला घातला. त्यानंतर अवघ्या दोन तासांनी आजीनेही जगाचा निरोप घेतला.

जळगाव – फैजपूर गावातच राहणाऱ्या आजीची प्रकृती खालावल्याने तिला पाहण्यासाठी २४ वर्षीय नातू आला. मात्र आजीची भेट घेऊन तिची विचारपूस करण्यापूर्वी घराची पायरी चढतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नातवाचा मृत्यू झाला, तर त्यानंतर अवघ्या दोन तासांनी आजीनेही जगाचा निरोप घेतला.जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात ही मन सुन्न करणारी घटना मंगळवारी घडली आहे. वैभव विष्णू मोरे (वय २४ वर्ष) असं मयत नातवाचं नाव आहे, तर कमलाबाई कोंडू मोरे या नव्वदीच्या आजीबाईंनी प्राण सोडले.(A 24-year-old grandson came to see the grandmother living in the village as her health deteriorated. However, before meeting the grandmother and asking her questions, the grandson died of a heart attack while climbing the steps of the house, and just two hours later, the grandmother too passed away. This mind-numbing incident took place in Faizpur city of Jalgaon district on Tuesday. The name of the deceased grandson is Vaibhav Vishnu More (aged 24 years), while the ninety-year-old grandmother Kamalabai Kondu More has passed away.)

फैजपूर शहरातील लक्कड-पेठ भागात डी के मोरे ज्वेलर्सचे दत्तात्रय मोरे वास्तव्याला आहेत. त्यांची आई कमलाबाई या त्यांच्याकडे राहत असतात, तर त्यांचे दुसरे भाऊ विष्णू मोरे हे त्यांच्या कुटुंबासह फैजपूर शहरातीलच भारंबे वाड्यात राहतात.आई कमलाबाई यांची प्रकृती गंभीर असल्याबाबत दत्तात्रय मोरे यांच्याकडून मंगळवारी सकाळी भाऊ विष्णू मोरे यांना कळविण्यात आले. आजीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावर विष्णू मोरे यांचा मुलगा वैभव ऊर्फ विक्की हा आजीला पाहण्यासाठी काकाच्या घराकडे निघाला.काकाच्या घराची पायरी चढताच वैभव याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात तो खाली कोसळला, या ठिकाणच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैभवला डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असता, दुसरी दुःखद घटना घडली.(Heartbreaking…. Grandson who came to see sick grandmother dies of heart attack within two hours….)

आजी अन् नातवाची एकमेकांशी शेवटची भेटही झाली नाही – नातू वैभवच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन तासांनी वैभवची आजी कमलाबाई यांचाही मृत्यू झाला. वैभव मोरे याचा पहाटे चार वाजेच्या सुमारास, तर त्याची आजी कमलाबाई मोरे यांचा दोन तासाच्या अंतराने सकाळी सहा वाजता मृत्यू झाला. आजीची भेट घेण्यासाठी वैभव घरापर्यंत पोहचला मात्र आजीला पाहण्यापूर्वीच त्याच्यावर हृदयविकाराच्या झटक्याच्या रुपाने काळाने झडप घातली. वैभव आणि आजीची शेवटची भेट होऊ शकली नाही.

आजी आणि नातावाची एकाचवेळी अंत्ययात्रा आणि अंत्यविधी – एकाच दिवशी अवघ्या दोन तासांच्या अंतरात आजी व नातवाच्या मृत्यूने फैजपूर शहर सुन्न झालं आहे. मंगळवारी दुपारी आजी आणि नातवाची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Heartbreaking…. Grandson who came to see sick grandmother dies of heart attack within two hours….)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!