Thursday, July 25, 2024
Homeकृषिहुमणी नियंत्रण मोहिमेत ग्राम पंचायत डिंग्रजवाडी च्या पुढाकाराने प्रकाश सापळे साहित्याचे मोफत...

हुमणी नियंत्रण मोहिमेत ग्राम पंचायत डिंग्रजवाडी च्या पुढाकाराने प्रकाश सापळे साहित्याचे मोफत वाटप

कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्राम पंचायत डिंग्रजवाडी यांच्या पुढाकाराने हुमणी नियंत्रण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले नियंत्रणासाठी पाऊस झाल्यानंतर बाहेर पडणारे हुमणीचे भुंगेरे प्रकाश सापळे लावून त्यात पकडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जेणेकरून हुमणी अळीचा बंदोबस्त होण्यास मदत होते डिंग्रजवाडी ,कोरेगाव भीमा, धानोरे ,वढू या नदीकाठी परिसरातील मुख्य पीक ऊस असल्याने हुमणी अळी बंदोबस्तास खूप महत्त्व आहे या अळीचे अंडी, अळी ,कोष भुंगेरे असा जीवनक्रम असून यातील भुंगेरे अवस्थेत किडीचे नियंत्रण करणे सोपे व गरजेचे असते नंतर ही कीड खूप उपद्रव करते तसेच टीका नियंत्रणात आणणे कठीण होते त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा खूप खर्च होऊन त्याचा जमिनीवरती विपरीत परिणामही होतो. त्यामुळे या अवस्थेत उपाय होणे गरजेचे आहे .

यावेळी शेतकऱ्यांना पी एम एफएमइ,महाडीबीटी, मग्रारोहयो फळबाग, कृषी सोलर पंप, बीज प्रक्रिया इत्यादी विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सरपंच यशवंत गव्हाणे यांचे हस्ते सापळे किट साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक सदानंद फडतरे , कृषि अधिकारी प्रशांत दोरगे, कृषि मित्र भालचंद्र गव्हाणे, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे,बापू मल्हारी गव्हाणे ,संभाजी पाटिलबुआ गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणेअनिल गव्हाणे,संपत गव्हाणे, गोपीनाथ गव्हाणे, नारायण गव्हाणे, शहाजी गव्हाणे,दिलीप गव्हाणे,शहाजी गव्हाणे,मधुकर गव्हाणे,रोहिदास गव्हाणे,प्रवीण गव्हाणे शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!