Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याहवेली तालुक्यात खरेदी खते सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्यात येणार -...

हवेली तालुक्यात खरेदी खते सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्यात येणार – संदीप भोंडवे

कोरेगाव भीमा – दिनांक १३ ऑगस्ट

हवेली तालुक्यात खरेदी खते सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मुंद्रांक नोंदणी विभागाचे महानिर्देशक श्रावण हार्डीकर यांना निवेदन देत भाजपाचे हवेली तालुका अध्यक्ष संदिप भोंडवे यांनी दिला आहे .

खरेदीदस्त नोंदणीमध्ये अधिका – यांकडुन प्रचंड प्रमाणात काळ्या पैशाची मागणी होत असुन त्याची पुर्तता केल्यास शेतजमिनीचे ११ गुंठे क्षेत्राच्या खरेदीदस्त नोंदणीस काहीच अडचण येत नाही . अशा प्रकारे अतिरीक्त पैसे घेऊन हवेली तालुक्यामध्ये आजही ही अनेक खरेदीदस्त नोंदणी सुरू आहे . तशा प्रकाराचे लेखी पुरावे उपलब्ध असल्याबाबत भोंडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

संदीप भोंडवे यांची निवेदनातून मागणी –

१) संपुर्ण महाराष्ट्रामध्ये व पुणे जिल्हामध्ये होत असलेली शेतजमिनीचे ११ गुंठे क्षेत्रफळ जागेची खरेदीदस्त नोंदणी हवेली तालुक्यामध्ये तात्काळ सुरू करण्यात यावी .

२) शेतजमिनीचे ११ गुंठे क्षेत्रफळ असलेली जागा एकापेक्षा जास्त व्यक्तिंच्या नावावर नोंदविणे वेकायदेशीर असेल तर संपुर्ण महाराष्ट्र व पुणे जिल्हामध्ये तशा प्रकारचे दस्त ज्या ज्या सवरजिस्टर अधिका – यांनी नोंदविले आहे त्यांना तात्काळ निलंवित करून त्यांची चौकशी करण्यात यावी .

मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकाडाबंदी व तुकडाजोड कायदा १९४७ नुसार राज्यातील ११ गुंठे जमीनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची रजेस्ट्री करण्यावर प्रतिबंध घातला आहे . या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे . न्यायालय निर्णयानंतर राज्यात व पुणे जिल्ह्यात हवेली तालुका वगळून सर्वत्र ११ गुंठे क्षेत्राचे खरेदी खते सुरू झाली आहेत . मात्र हवेली तालुक्यात खरेदी खते नोंदवून घेतली जात नसल्याने तालुक्यावर हा अन्याय असून हवेली तालुक्यात खरेदी खते सुरु न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मुंद्रांक नोंदणी विभागाचे महानिर्देशक श्रावण हार्डीकर यांना निवेदन देऊन भाजप हवेली तालुका अध्यक्ष संदिप भोंडवे यांनी दिला आहे .

संदीप भोंडवे यांनी निवेदनामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या नावावर शेत जमिनीचे ११ गुंठ्याचे क्षेत्र नोंदणी करण्यास फक्त हवेली तालुक्यातच मनाई केली आहे . पण औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेत जमिनीच्या ११ गुंठ्यांचे खरेदीदस्त नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे .

औरंगाबाद खंडपीठाने परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय देऊन २०२२ पासून हवेली तालुक्यातील शेत जमिनीचे ११ गुंठ्याचे खरेदी दस्त नोंदणी अजूनही बंद आहेत . संपूर्ण राज्यात व पुणे जिल्ह्यात एकच कायदा आहे . मात्र हवेली तालुक्यात ११ गुंठे जमीनींची खरेदी खते थांबविण्यात आल्याने हवेली तालुक्यातील भूमिपूत्रांवर अन्याय होत आहे . गुंठ्यात शेतजमीन विकून मालमत्ता विक्रीचे सर्व व्यवहार बंद असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे . नाईलाजास्तव शेतकऱ्यांना ११ गुंठे पेक्षा अधिक जमीन क्षेत्र खरेदी व विक्री करणे भाग पडत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याचा धोका अधिक बनला आहे . परंतु जिल्ह्यात इतर तालुक्यांत तुकडा बंदी हा कायदा लागू नसल्याने जिल्ह्यात व राज्यात ११ गुंठे जमीनीची खरेदी व नोंदणी सुरू आहे . संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ८६७ गावे पीएमआरडी मध्ये समाविष्ट झालेली आहेत . हवेली तालुक्यातील ६० ते ७० गावे पीएमआरडीएत सामाविष्ठ आहे . मात्र हवेलीतच हा नियम लागू का केला आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे .

वास्तविक पुणे शहरातील अथवा शहरात असलेल्या बांधकाम व्यवसायिकांशी हात मिळवणी करून त्यांच्या हितासाठी हवेली तालुक्यामधील ११ गुंठे क्षेत्रफळाची खरेदी दस्त नोंदणी बंद केलेली आहे असं भासवून गुपचूप खरेदीदस्त नोंदवून मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा जमा करण्याचे काम अधिकारी करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे . हवेली तालुक्यात विशिष्ट हेतूने हा निर्णय लागू असून तालुक्यामध्ये तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांनी दिला आहे .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!