Friday, June 21, 2024
Homeक्राइमहवेली तालुक्यातील फुलगाव येथील मेडिकलमध्ये शटर उचकाटावून फक्त तीन मिनिटांत केली चोरी

हवेली तालुक्यातील फुलगाव येथील मेडिकलमध्ये शटर उचकाटावून फक्त तीन मिनिटांत केली चोरी

सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चोरीचा सर्व प्रसंग, अवघ्या तीस सेकंदामध्ये उचकाटले शटर

कोरेगाव भीमा – फुलगाव (ता.हवेली) आळंदी – तुळापूर फाटा मुख्य रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी असणाऱ्या गुरुकृपा मेडिकलचे शटर उचकटवून आतमध्ये असणाऱ्या दरवाजाला असणारे लोक कटवणीच्या साहाय्याने तिदात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (At Phulgaon in Haveli taluka, a medical shop was stolen in just three minutes by lifting the shutters)

फुलगाव ( ता.हवेली) येथील निखिल संतोष शिंदे यांचे गुरुकृपा मेडिकल असून दिनांक २९ जुलै रोजी पहाटे चार वाजून आठ मिनिटांनी दोन चोरट्यांनी मेडिकलचे शटर उचकटवून आतमधील असणाऱ्या दरवाजाचे लॉक कटावणीच्या साहाय्याने तोडत अंदाजे रोख रक्कम पंधरा ते वीस हजार चोरीला गेली आहे.

सदर चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्ही फुतेज मध्ये रेकॉर्ड झाला असून दोघा चोरट्यांनी अवघ्या पहल्या तीस सेकंदात शटर उचकाटवले असून दोन मिनिटांत चोर मेडिकल मध्ये घुसला असून सदर व्हिडिओ पाहता हे दोन्ही चोर सराईत चोर असल्याचे दिसत असून त्यांनी तोंडाला व शरीराला पूर्ण झाकले होते. मुख्य रस्त्यावरील मेडिकल फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याने नागरिकांमध्ये भीती व संताप व्यक्त होत आहे. (At Phulgaon in Haveli taluka, a medical shop was stolen in just three minutes by lifting the shutters)

याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संदेश शिवले पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!