Friday, June 21, 2024
Homeक्रीडाहरियाणा येथे होणाऱ्या १५ वर्षीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जाणता राजा कुस्ती केंद्राच्या...

हरियाणा येथे होणाऱ्या १५ वर्षीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ७ मल्लांची निवड

कोरेगाव भीमा – रोहतक ( हरीयाना ) येथे होत असलेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ७ कुस्तीगीरांची निवड.

रोहतक (हरियाणा ) येथे २४ ऑगस्ट रोजी १५ वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती होत असुन सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघामध्ये जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ७ कुस्तीगीरांची निवड झाली.

महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच सह्याद्री कुस्ती संकुल , वारजे पुणे येथे आज संपन्न झाली . यावेळी जनता राजा कुस्ती केंद्रातील ७ मल्लांची फ्री स्टाईल, ग्रीकोरोमन अशा कुस्ती प्रकारांमध्ये त्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या मल्लांची नावे – फ्री स्टाईल३८ कीलो – वक्रतुण्ड फदाले ४८ कीलो – पै. विशाल शिळीमकर ६२ कीलो – पै ओम काटकर ग्रिकोरोमन४८ कीलो – पै.उत्कर्ष ढमाल* ५२ कीलो – पै. साईनाथ पारधी ६८ कीलो – पै निखिल तनपुरे ७५ किलो – रोहीत आजबे

नॅशनल करीता निवड झालेले कुस्तीगीर NIS कुस्ती कोच महीपत कुंडु , NIS कुस्ती कोच सुरज तोमर , महावीर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कुस्तीगीर केंद्राचे संस्थापक संदीप भोंडवे व अध्यक्ष सचिन पलांडे यांनी सर्व कुस्तीगीरांचे अभिनंदन केले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!