Friday, July 12, 2024
Homeक्राइमहडपसर पोलिसांकडून ११ चोरीचे गुन्हे उघडकीस

हडपसर पोलिसांकडून ११ चोरीचे गुन्हे उघडकीस

हडपसर प्रतिनिधी सुनील थोरात

हडपसर – दिनांक २१ जुलै हडपसर पोलिसांनी १० वाहनचोरीचे गुन्हे व फ्लिपकार्ट बॅग चोरीचा १ असे ११ गुन्हे उघडकीस आणले असून पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरीचा हॉटस्पॉट असलेल्या अँमनोरा मॉलच्या पाठीमागील भागातून वेळोवेळी दुचाकी गाड्या चोरीस जात असल्याचे दिसून आल्याने त्यानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक , अविनाश शिंदे पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार अवनिाश गोसावी , प्रशांत दुधाळ , सुरज कुंभार , भगवान हंबर्डे असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना आकाश मनोहर गायकवाड (वय २६ वर्ष) रा . हडपसर हा संशयास्पद दुचाकीसह सापडला त्याच्याकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारना केली असता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासामध्ये आरोपी आकाश मनोहर गायकवाड (वय २६ वर्ष ) रा . हडपसर याने १० वाहनचोरीचे गुन्हे हडपसर , कोंढवा , भारती विद्यापीठ , सासवड या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले .

आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश –

फ्लिपकार्ट डिलेव्हरी बॉय हा दिनांक १६ जुलै रोजी पार्सल देण्याकरीता अँड्रीनो टॉवर अँमनोरा पार्क येथे दुचाकी पार्क करून , पार्सल देण्याकरीता जाऊन आला तेंव्हा दुचाकीवर लावलेली डिलेव्हीरी बॅग १ ९ , ००० / – चे डिलेव्हरी सामान बॅगसह चोरीस गेली होती . सदरची डिलेव्हरी बॅग व चोरीस गेलेले साहीत्य हे आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे . आरोपीकडून एकुण ११ गुन्हे व पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . त्यामध्ये ९ ॲक्टिवा , १ पॅशन प्रो अशा अशा १० दुचाकी आणि फ्लिपकार्ट बॅग मघिल बारकोड असलेला माल असा जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे ,पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विश्वास डगळे , तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे , पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , अंकुश बनसुडे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , सचिन गोरखे , सुरज कुंभार , भगवान हंबर्डे यांच्या पथकाने कामगिरी केली.फोटो ओळ – हडपसर पोलिसांनी जप्त केलेल्या १० चोरीच्या दुचाकी वाहनांसह फ्लिपकार्ट बॅग

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!