हवेली प्रतिनिधी – सुनील थोरात
हडपसर ( ता.हवेली) – दिनांक ७ फेब्रुवारी
पुर्व हवेलीतील हडपसर पोलीस ठाण्यात हळदी कुंकाचे हडपसर विधानसभा भाजप ओबीसी महिला अध्यक्ष सीमा शेंडे यांनी आयोजन केले होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी व शांततेसाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. कर्तव्याची व समाजाची जबाबदारी खांद्यावर असल्याने त्यांना कोणताच सन ,उत्सव ,कार्यक्रम साजरे करता येत नाही याची जाणीव ठेवत पोलीस सेवेत असनाऱ्या भगिनिंसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तेही खुद्द हडपसर पोलीस ठाण्यात हा अनोखा सोहळा रंगला.
खरे तर हळदी कुंकू हा कार्यक्रम महिलांसाठी सन्मान देणारा, हळदी कुंकू म्हटले की सौभाग्याची लेण हा महिलांसाठी आनंदाचा क्षण असतो कर्तव्य बजावत असताना अशा समारंभात महिला पोलीस कर्मचारी यांना घरी जाता येत नाही. म्हणून सीमा शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर पोलीस ठाण्यात ४० महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे आयोजन हडपसर, मधील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येत कार्यक्रम राबविला. यावेळीसीमा शेंडे, दर्शना मूरके, अश्विनी वाघ, विजयालक्ष्मी, मनिषा राऊत, वैशाली वाडकर, धनश्री पाटील, वैशाली शितोळे, हर्षदा पाटील उपस्थित होते.