Monday, June 17, 2024
Homeक्राइमहडपसर येथे "जावयानेच केली घरफोडी "

हडपसर येथे “जावयानेच केली घरफोडी “

दोन वेगवेगळ्या घटनांमधील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील १० लाख रूपयांचे २० तोळे सोने जप्त .

हडपसर प्रतिनिधी सुनील थोरात

हडपसर – दिनांक १८ जुलै

हडपसर ( ता.हवेली) येथील एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये जावयानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हडपसर येथील फिर्यादी विश्वजीत अशोक कांबळे यांनी घरामध्ये दिनांक १० जुलै रोजी चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती. याबाबत हडपसर पोलीस पथकाने तपासात घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड अगर कोणत्याही इतर वस्तुस हात लागलेला नसल्याने दाखल गुन्हा हा ओळखीच्या व्यक्तींनी केला असावा ही शक्यता गृहीत धरून बारकाईने विचारपूस सुरु केली .

पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ यांचे माहितीवरून जावई निखील संभाजी पवार (वय २३ वर्ष )रा . संभाजीनगर चाळ , जयसिंगपुर , कोल्हापुर यास अधिक चौकशी केली असता त्याने सास – यांच्या घरात चोरी केल्याचे कबुल केले .

सासरकडची सर्व मंडळी दुपारी पिक्चरला गेल्याची संधी साधून आरोपी जावयाने डुप्लीकेट चावीने फ्लॅट उघडून आत प्रवेश केला अणि कपाटातील सोन्याची चैन , गंठण , अंगठी , कानातील टॉप्स असा मुद्देमाल चोरून नेल्याची कबुली जबाब दिला . आरोपीकडून त्याने चोरून नेलेले ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा किं.रू ३,५०,००० / – चा माल जप्त केला आहे .

हडपसर पोलिसांनी आणखी एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

हडपसरच्याच दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादी शिवाजीराव जनार्दनराव पाटील (वय ७० वर्ष ) हे पुणे मनपा पॅनलवर ॲडव्होकेट आहेत . त्यांना कार्यक्रमानिमीत्त बिदर , कर्नाटक येथे जाण्याचे असल्याने ते घरात नसताना घरातील दागिने चोरी जातील या भितीने त्यांनी त्यांचे घरातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने प्रवासात सोबत घेतले बिदर , कर्नाटक येथे जाण्यासाठी त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर नसल्याने त्यांनी पर्यायी ड्रायव्हर जमिल शेख यास बोलावले व कर्नाटक येथे गेले .

सदर कार्यक्रम उरकून पुण्यात आल्यावर दिनांक १२/०५/२०२२ रोजी सकाळी दागिने ठेवलेली सुटकेस पाहीली असता , त्यामध्ये दागिने दिसले नाहीत . त्याबाबत फिर्यादी यांनी दिनांक ०२ जुलै रोजी हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली .

शिवाजीराव पाटील यांच्याकडे काम केलेल्या संशयीत ड्रायव्हवर याचा फोटो अथवा इतर उपयुक्त माहीती उपलब्ध नव्हती . हडपसर पोलीस ठाणे तपासपथकातील अंमलदार यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातुन आरोपी हा दापोडी येथील रहीवासी असल्याचे दिसून आल्याने तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे , अविनाश शिंदे आणि पोलीस अंमलदार शाहीद शेख , अविनाश गोसावी सुरज कुंभार यांनी सलग दोन दिवस दापोडी भागात फिरून आरोपीबाबत कोणतीही उपयुक्त माहीती नसताना अगर फोटो नसताना , आरोपी जमील अयुब शेख( वय ४५ वर्ष रा . केदारी हाईटस , शिवाजी पतुळाजवळ , दापोडी ) याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून चोरून नेलेले दागीन्यापैकी १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किं . रू ६,५०,००० / – चे जप्त करण्यात आलेले आहेत .

हडपसर तपास पथकाने मागिल ५ महिन्यात ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून सोने , मौल्यवान दागिने आणि वाहने मिळून ६७ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे नामदेव चव्हाण , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर नम्रता पाटील यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग बजरंग देसाई , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन अरविंद गोकुळे , विश्वास डगळे , विजयकुमार शिंदे , अविनाश शिंदे , सुशील लोणकर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , अंकुश बनसुडे , सुरज कुमार , भगवान हंबर्डे यांचे सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!