Friday, July 26, 2024
Homeइतरहडपसर येथील टोळी प्रमुख असलम शेख याचा मोका केस मध्ये जामीन मंजूर

हडपसर येथील टोळी प्रमुख असलम शेख याचा मोका केस मध्ये जामीन मंजूर

पुणे – पुणे येथील राहुल घडई यांच्यावर कोयता ,लोखंडी रॉड व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत प्राणघातक हल्ला करणाऱ्या अस्लम शेख व त्याचे टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती त्यानुसार दि. २३/०७/२०२१ रोजी कमिशनर ऑफ पोलिस श अमिताब गुप्ता यांनी असलम शेख व त्याचे टोळीला मोक्का लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे मोका कायद्याचे कलम ३(१) (२) ३(२) ३(४) हे आरोपीविरुद्ध लावण्यात आले. आरोपी अस्लम शेख व त्याचे साथीदार विरुद्ध पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी अस्लम शेख व त्याचे साथीदार विरुद्ध पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी अस्लम शेख यांचे वतीने मे.विशेष न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. दि.०३/०३/२०२२ रोजी सुनावणी झाली आरोपी अस्लम शेख यांचे वतीने ऍड.रवींद्र भोसले व ऍड.अस्लम शेख यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्ष व आरोपी यांचे युक्तिवाद ऐकून मे. कोर्टाने आरोपीचा जामीन मंजूर केला. ऍड. रवींद्र आर भोसले व ऍड.असलम शेख यांना ऍड.मंजुर शेख व ऍड.मोहम्मद शेख यांनी सहाय्य केले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!