Friday, July 26, 2024
Homeइतरहडपसर पोलिसांची मोठी कामगिरी ७ घरफोड्या करणाऱ्या चोरांना ठोकल्या बेड्या १३ लाख...

हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी ७ घरफोड्या करणाऱ्या चोरांना ठोकल्या बेड्या १३ लाख रूपये किंमतीच्या सोने-चांदी मुद्देमालासह केले जेरबंद

वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन अरविंद गोकुळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी हस्तगत केलेल्या १३ लाख रूपये किंमतीच्या सोने -चांदीच्या दागिन्यांसह

प्रतिनिधी सुनील थोरात

हवेली (हडपसर) : येथील अनिलकुमार जग्गाराव बेदालम (रा. स्वप्नपुर्ती सोसायटी, हडपसर ) हे बालाजी दर्शनासाठी कुटूंबासह दिनांक १० फेब्रुवारीला गेले होते त्यानंतर ते घरी परत आले असताना त्यांचे बंद घरात चोरी झाल्याचे व सोन्याचे दागीने चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलीस गुन्हा दाखल केला होता.त्यानुसार हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून तांत्रिक विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, निखील पवार व सचिन जाधव यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी आरोपी नामे अर्जुन अशोक पाटील सय ३ वर्ष रास नं १०६, महाकाली मंदीराशेजारी गोसावी मस्ती हडपसर पुणे यास ताब्यात घेतले. त्यास पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचेकडे तपास करता त्याने त्याचा साथीदार आकाश लाकरे यासह हडपसर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अर्जुन अशोक पाटील (वय ३१ वर्ष रा. स.नं १०६, महाकाली मंदीराशेजारी, गोसायी वस्ती, हडपसर ) याचेकडे केले तपासात चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून १६५ ग्रॅम वजनाचेव ७,१५,००० किमतीचे सोन्याचे दागीनेहस्तगत करण्यात आले असून सदर चोरी करणारे आरोपी विजय सुभाष देशमाने रा. मु.पो. राऊतवाडी, बुलढाणा यास गुन्हे शाखा युनिट-५ यांनी ताब्यात घेवून पुढील तपासासाठी हडपसर तपास पथकाचे ताब्यात दिले.त्यानन्तर हडपसर पोलीसानी आरोपीस विचारपूस करून सदर आरोपी आणि सोनार अक्षय श्रीनीवास दिक्षीत (२५ वर्ष रा. ओमकार कॉलनी, विजयनगर काळेवाडी पिंपरी पुणे) यांच्याकडून १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व ३५ ग्रॅम चांदीचे दागीने असा एकुण किं. रू ६,०३,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपास पथकाचे नवनियुक्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे यांनी कष्टपूर्वक आणि कौशल्याने तपास करून ७ घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणून एकुण १३ लाखापेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरचा तपास नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडल ५ पुणे शहर यांचे सुचना व मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर बजरंग देसाई,, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन अरविंद गोकुळे, पुणे शहर पोनि (गुन्हे) विश्वास डगळे, पोनि (गुन्हे) दिगंबर शिंदे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार, प्रशान टोणपे रियाज शेख, सचिन गोरखे सुरज कुमार यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली केली

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!