Saturday, July 27, 2024
Homeशिक्षणस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भुजबळ विद्यालयाच्या विद्यार्थी व पालकांची प्रभातफेरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भुजबळ विद्यालयाच्या विद्यार्थी व पालकांची प्रभातफेरी

तळेगाव ढमढेरेदिनांक ०९ ऑगस्ट

तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने क्रांती दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रथम गावातून शालेय विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या समवेत प्रभात फेरी काढून हर घर झेंडा, हुतात्मा जवान व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली तसेच प्रभात फेरी झाल्या नंतर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकात अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना हुतात्मा पिंगळे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून त्यांनी केलेल्या शूर घटनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व कार्यक्रमा च्या शेवटी विद्यालयात येऊन ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत झाले व आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, ग्रामसेवक बापूसाहेब गोरे ,तळेगाव ढमढेरे परिसरातील आजी-माजी सैनिक ग्रामस्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण व विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!