Thursday, July 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांग बांधवांनी केले खाऊचे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांग बांधवांनी केले खाऊचे वाटप

जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज (ता. कराड) यांच्यावतीने स्तुत्य उपक्रम

कुलदीप मोहिते कराड

दिनांक १५ ऑगस्ट उंब्रज ( ता.कराड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांच्या वतीने प्रमाणे जागृती आश्रम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उंब्रज येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मार्फत संस्थेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवत असते. दिव्यांग बांधवांचे हे काम प्रशंसनीय व उल्लेखनीय आहे .

या कार्यक्रमास जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव , संस्थेचे सचिव प्रमोद गायकवाड, सदस्य दीपक खडंग ,अरविंद जाधव ,महेश काशीद, दिगंबर भांदिर्गे, उमेश शेटके, सागर स्वामी ,जागृती आश्रम विद्यालयाचे सचिव कुंदन चव्हाण ,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर , शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!