Thursday, July 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सरपंच सुनंदा दरेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना हरिपाठ वाटप

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माजी सरपंच सुनंदा दरेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना हरिपाठ वाटप

आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला

मोबाईल – इंटरनेटच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थ्यांना संत विचारांनी सुसंस्कारित बनवण्यासाठी पाच हजार हरिपाठ पुस्तकाचे वाटप

मनसे नेते रामदास दरेकर यांच्या संकल्पनेने संत विचारांची भावी पिढी घडवण्यासाठी अनमोल प्रयत्न

ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांचे संत विचारांचे मार्गदर्शन

कोरेगाव भीमा – दिनांक १५ ऑगस्ट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सणसवाडी (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच सुनंदा दरेकर विविध उपक्रम राबवत असतात असच एक उत्कृष्ट सामजिक उपक्रम नुकतच राहण्यात आला.मनसे नेते रामदास दरेकर व सरपंच परिषद ,मुंबई पुणे जिल्हा महिलाध्यक्षा व माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या संकल्पनेतून सणसवाडी परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनिंना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ( माऊलींच्या) पाच हजार हरिपाठ पुस्तकांचे वाटप करत संत विचार घरोघरी पोचविण्याचा विधायक उपक्रम पार पडला.

शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये संत विचार रुजावेत व सुसंस्कारित पिढी निर्माण होऊन , मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या भावी पिढीला संत विचारांकडे व भारतीय संस्कृतीतील महान व तेजस्वी संत विचारांची ओळख व्हावी ते नित्य व दररोज वाचनात येऊन त्याप्रमाणे त्यांचे सुसंस्कारित व आदर्श आचरण होऊन भावी पिढी सुसंस्कारित व संत विचारांच्या अदर्शावर चालणारी निर्माण होण्यासाठी हा समाजोपयोगी व भावी पिढीला आदर्शवत घडवणारा उपक्रम राबवण्यात आला. सणसवाडी येथील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी संताचे विचार भावी पिढीला समृद्ध करतील व आदर्श घडवतील असे मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या काळामध्ये मुलांना मोबाईलची अत्यंत सवय लागली आहे.इंटरनेट व मोबाईल याच विश्र्वामध्ये मुले रमताना दिसत आहेत. मुले बोलेणाशी झाली आहेत, शिक्षक ,पालक व मित्रमैत्रिणींच्या सोबत मनमोकळा व उत्तम सूसंवाद साधला जात नाही. संवादामध्ये दुरावा निर्माण होत आहे.मुले चिडचिड करत आहेत नेमके काय होतेय हे सांगत नाही आणि एकलकोंडी होऊ पाहत आहेत यावेळी त्यांना या सर्व विळख्यातून सोडवण्यासाठी संत विचारांचा मोठा आधार आहे .यावेळी उद्योग सणसवाडी गावच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल भुजबळ, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, दत्तात्रय हरगुडे, राजेंद्र दरेकर,अक्षय कानडे, शशिकला सातपुते,सुवर्णा रामदास दरेकर, रुपाली दरेकर, उद्योजक नवनाथ दरेकर,नवनाथ हरगुडे, सावता माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ,माजी सरपंच रमेश सातपुते,माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर ,दगडू दरेकर,अनिल दरेकर, ग्राम सेवक बाळनाथ पवणे, मुख्याध्यापक भंडारे सर , शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

संत विचारांनी आपल्या हजारो पिढ्या घडवल्या आहेत तेच विचार समाजाला व संस्कृतीला मार्गदर्शक ठरत आहेत.मोबाईल व इंटरनेटच्या विळख्यात सापडलेले बालके अबोल व चिडचिड झाली आहेत त्यांना संत विचारांची ओळख होऊन संत विचार घरोघरी पोचावेत त्यांचे जीवन तेजस्वी व आनंदी होण्यासाठी हरिपाठ वाटप केले आहे . – माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर , महिलाध्यक्षा पुणे जिल्हा, सरपंच परिषद , मुंबई

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!