Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्तास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शिरूर लोकसभा मतदार संघात रक्तदान शिबिर - डॉ अमोल...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शिरूर लोकसभा मतदार संघात रक्तदान शिबिर – डॉ अमोल कोल्हे

रक्तदात्याला आयुष्यभर मिळणारा गरजेच्या वेळी रक्त

नातेवाईकांना १ वर्ष रक्त मोफत

तीन लाखांचा अपघाती विमा

तीन लाखांचा अतिरिक्त वैद्यकिय विमा

प्रत्येक रक्तदात्यास सहा लाखांचे विमा कवच

कोरेगाव भीमा – संसदरत्न डॉ अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून व जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाजेवाडी चौफुला येथील मयुरी लॉन्स मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य स्वरूपात शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार डॉ कोल्हेंच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करत आगळी वेगळी देशसेवा करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आयुष्यभर मिळणारा गरजेच्या वेळी रक्त,नातेवाईकांना १ वर्ष फक्त मोफत रक्त,तीन लाखांचा अपघाती विमा,तीन लाखांचा अतिरिक्त वैद्यकिय विमा,प्रत्येक रक्तदात्यास एकूण सहा लाखांचे विमा कवच मिळणार आहे. याबाबत डॉ कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!