ॲड. मोहम्मद शेख
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाच्या वतीने आधार कॅम्पचे आयोजन वढू बुद्रुक रस्ता इनामदार वस्ती येथील ॲड. मोहम्मद शेख यांच्या कार्यालयात करण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी दिली.
कोरेगाव भिमा येथे सर्वसामान्य नागरिकांना आधार अपडेट करणे, मोबाईल नंबर लिंक करणे, नावात दुरुस्ती करणे व आधार पॅन लिंक करणे अशी आधार कार्डशी सबंधित अनेक कामे करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. मोहम्मद शेख यांनी दिली.कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील नागरिकांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड मोहम्मद शेख यांनी केले आहे.