Thursday, June 20, 2024
Homeताज्या बातम्यास्वराज्य राष्ट्रच्या बातमीचा प्रभाव.. वाजेवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावायला वनविभागाची धावाधाव

स्वराज्य राष्ट्रच्या बातमीचा प्रभाव.. वाजेवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावायला वनविभागाची धावाधाव

एक बातमी जी समस्या सोडवते जनसामान्यांची

कोरेगाव भीमा – वाजेवाडी ( ता.शिरूर) येठील नागरिकांच्या मनामध्ये बिबट्याची पराच्नद दहशत बसली होती.महिला भगिनी, शेतकरी व कामगार यांना वारंवार बिबट्या दिसत होता.यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व कामावर मोठा परिणाम झाला होता.या बाबत स्वराज्य राष्ट्र ने शिरूर वनविभागाच्या आशीर्वादाने वाजेवाडी बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ बातमी प्रसारित करताच वनविभागाला जाग आली असून वाजेवाडी येथे पिंजरा बसवण्यासाठी धावाधाव केली असून पिंजरा बसवण्यात आला आसल्याने नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे. स्वराज्य राष्ट्र ची बातमी प्रसारित होताच एका दिवसात बसवण्यात आला पिंजरा (Impact of the news of Swarajya Rashtra.. Forest department rushing to install a cage to catch the leopard in Wajewadi)

शिरूर वनविभागाच्या आशीर्वादाने वाजेवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू..

वाजेवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सैनिक ज्ञानेश्वर दत्तोबा वाजे यांनी शेतात पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या पाहिला होता. पूजा गणेश वाजे यांना सकाळी चालण्यासाठी गेल्या आता अवघ्या वीस फुटांवर बिबट्या दिसला त्यामुळे महिला प्रचंड दहशतीखाली आहेत. अनिल निंबराज वाजे या शेतकऱ्याला संध्याकाळी साडेसातला गावच्या रस्त्याच्या बाजूलाच बिबट्या दिसला , एका शेतात शेतकऱ्याला पन्नास फुटावर तर बाळासाहेब रंगनाथ वाजे शेतकऱ्याला चारशे मीटर अंतरावर बिबट्या दिसला यामुळे नागरिकांना वारंवार बिबट्या दिसत असून सकाळी मॉर्निंग वॉक, दैनंदिन कामे, शेतीतील कामे करता येत नसून अगदी करायची तर जीव मुठीत धरून कामे करावी लागत आहे. याबाबत वन विभागाला जाग तरी कधी येणार नागरिकांच्या जीविताबद्दल काही करणार आहे का नाही ? असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत आहे याबाबत सरपंच मोहन वाजे यांच्यासह ग्रामस्थांनी शिरूर वनविभाग यांच्याशी पत्रव्यवहार करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती याबाबत काही ग्रामस्थांनी वनविभागाला तंत्रज्ञानाचा वापर करत ईमेल करत पिंजरा बसवण्याची मागणी केली होती. (Impact of the news of Swarajya Rashtra.. Forest department rushing to install a cage to catch the leopard in Wajewadi )

याबाबत शिरूर वनविभागाचे अधिकारी जगताप साहेब यांनी अत्यंत संवेदनशीलपणे वाजेवाडी येथे नागरिकांच्या जीविताची काळजी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने पिंजरा उपलब्ध करून देत बसवण्यासाठी प्रयत्न केले याबाबत वनविभागाचे कर्मचारी दहातोंडे यांनी सातत्याने प्रयत्न करत तातडीने पिंजरा बसवला. ( Impact of the news of Swarajya Rashtra.. Forest department rushing to install a cage to catch the leopard in Wajewadi)

वाजेवाडी येथे पिंजरा बसवण्यात आल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.याबाबत स्वराज्य राष्ट्र, शिरूर वनविभागाचे अधिकारी जगताप साहेब व वनरक्षक दहातोंडे यांचे आभार मानले आहे.

पिंजरा बसवतान ग्रामस्थ व वनविभाग कर्मचारी उपस्थित होते

पिंजरा लावल्यानंतर वनरक्षक दहातोंडे यांनी रात्रीची गस्तही घातली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!