Sunday, September 15, 2024
Homeताज्या बातम्यास्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचे शिरूर येथे प्रहारच्या वतीने जल्लोषात स्वागत

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचे शिरूर येथे प्रहारच्या वतीने जल्लोषात स्वागत

आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या आवाहनाला शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरेगाव भीमा – दिनांक १२ नोव्हेंबर


शिरूर ( ता.शिरूर)दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय (independent Ministry of Disability) स्थापन करावे अशी मागणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करीत होते. त्यांची ही मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे.
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन होणार असल्याने अपंग संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करण्यात येत आहेत. (independent Ministry of Disability).


आमदार बच्चू कडू यांच्या आवाहनाला शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद – आमदार कडू यांनी येत्या ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करणार आहे, राज्य सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे, शंभर दिवसात दिव्यांगासाठी एक मोठा निर्णय घेतला, दिव्यांगाच एक स्वप्न होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झालं यासाठी मी अनेक आंदोलने केली त्यासाठी गुन्हे दाखल झाले त्यामुळे याचा जिल्हा जिल्ह्यात जल्लोष झाला पाहिजे यासाठी १२ तारखेला दुपारी बारा वाजता राज्यभरात जिल्हा जिल्ह्यात प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा करा या आवाहनाला शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


हलगी , ताशा वाजवत , बुंदी लाडू वाटप व प्रहार संघटनेच्या नावाच्या जयघोष करून जल्लोष साजरा – शिरूर तालुक्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपंग बांधवासोबत शिरूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर जिल्ह्यासह तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी हलगी ताशाच्या गजरात प्रहार संघटनेच्या नावाचा व आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या नावाचा जयघोष करत बुंदीच्या लाडूंचे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेच्या वतीने बुंदी लाडूचे वाटप करण्यात येऊन तोंड गोड करून दिव्यांग बांधवांनी जल्लोष व आनंद साजरा केला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून दिव्यांग बांधवांची होणारी परवड आता थांबेल, आम्हालाही आत्मसन्मानाने जगता येण्यासाठी, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठा फायदा होणार आहे असा आत्मविश्वास प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी (Prahar Organization) यावेळी व्यक्त केला आहे.


आमदार बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या मुळेच देशातील पहिले दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय –
आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग बंधवांसाठी असणारे कार्य सर्वांना परिचित आहे यासाठी त्यांनी केलेली वेगवेगळी आंदोलने , प्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांशी वादावादी झाली पण आमदार कडू मागे हटले नाही.
दिव्यांगासाठी आमदार कडू यांच्या प्रहार संघटनेमुळेच महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालयाची स्थापना होणार असुन दिव्यांगासाठी व्यापक स्वरूपात प्रहार संघटना कार्य करत आहे.

यावेळी प्रहार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम, उपाध्यक्ष उज्वला गाडेकर , कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, शिरूर तालुका महिलाध्यक्ष ज्योती हिवरे, शहराध्यक्ष नयना परदेशी ,शरद अध्यक्ष मनिष सोनवणे गणेश कचरे, संभाजी नवले, नारायण नवले, खंडेराव गोरडे, माया फलके ,कोरेगाव विभाग प्रमुख कुंडलिक वायकुळे, गेनू जाधव, रामदास गव्हाणे, वंदना शिरतोडे, रेश्मा कडलक, वंदना रामगुडे, दादाभाऊ निचित, अशोक बोरकर ,विजय काटे, कैलास पवार ,मोहन चव्हाण, पूजा भगत, राजा चव्हाण, जितेंद्र भगत ,हाणू गाडेकर, दुर्गम खैरे ,शिंदे ,तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!