Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्या'स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकॅथॉन २०२३'चे वाघोलीतील जेएसपीएम बी एस आय ओ...

‘स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकॅथॉन २०२३’चे वाघोलीतील जेएसपीएम बी एस आय ओ टी आर मध्ये यशस्वी आयोजन

वाघोली (ता.हवेली) येथील जेएसपीएम भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च मध्ये भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये तसेच खाजगी विभागांमध्ये ज्या समस्या प्रखरतेने जाणवतात त्यांचे समाधान व उपाय आजच्या डिजिटल युगामध्ये सॉफ्टवेअर व हार्डवेअरच्या माध्यमातून सोडविण्याचा केंद्र सरकारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

        शाळांमधील  आठवी कक्षावरील विद्यार्थी व इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमतेचा उपयोग करून सरकारी विभागांमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी संगणीकृत उपाय शोधण्याचा हा उपक्रम खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. त्या अनुषंगाने जेएसपीएम भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली मध्ये  इंटरनल SIH२०२३ चे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये एकूण ३० वेगवेगळ्या समस्यांवरती उपाय योजनेचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मोहम्मद रोशन जमाल टेक्निकल आर्किटेक्ट टेक महिंद्रा, सचिन वाळुंज सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर पॅटर्न टेक्नॉलॉजी व राजेश अडसूळ डेप्युटी मॅनेजर VOIS पुणे परीक्षक होते.

   परीक्षण करताना त्यांनी मुलांच्या सादरीकरणामधील तांत्रिक गोष्टींबद्दल इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू ने बहुमूल्य असे मार्गदर्शन केले व तसेच मुलांच्या नाविन्यपूर्ण उपयोजनांचें कौतुकही केले.

अभियांत्रिकी विभागातील विविध शाखेंमधील मुलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. वर्षा वाघ, प्रा. रश्मी शुक्ला, प्रा. पुनम गावडे,प्रा. रेखा कोतवाल  प्रा. श्रीशैल पाटील, प्रा.माधवी कुलकर्णी,  यांनी खूप मेहनत घेतली. 

   कार्यक्रमाची सुरुवात कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख डॉ. गायत्री भंडारी यांनी केले. यावेळी वाघोली संकुलाचे डायरेक्टर डॉ. सचिन आदमाने, प्राचार्य डॉ. टी के नागराज,डॉ. योगेश अंगल,डॉ.नीलम घुगे,डॉ. स्वाती गोडसे,डॉ. प्रवीण कचरे,डॉ. प्रवीण बारापत्रे हे मान्यवर उपस्थित होते.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२३ कॉलेजचे समन्वयक प्रा. नितीन शिवले यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!