Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रसोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकरणी तृप्ती देसाई भडकल्या अशी कृत्य केली तर लोक...

सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकरणी तृप्ती देसाई भडकल्या अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील

भाजपचे श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

पुणे – सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूमधील व्हिडीओ एका महिलेने सोशल मिडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेवर तृप्ती देसाई यांनी , “आज सोलापूरमध्ये एक व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हाच श्रीकांत देशमुख मुंबईत जातो. मला हनी ट्रॅप मध्ये अडकवले जाणार आहे, असे सांगतो. अरे हनी ट्रॅप मध्ये कोण अडकतो. ज्यांना अनैतिक संबंध ठेवण्याची खुमखुमी आहे त्यांना हनी ट्रॅपची भीती असते. मागच्या वेळी कीर्तनकारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता राजकीय नेत्यांचा होऊ लागला आहे. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगलं समजले जात आहेत. अशी कृत्य केली तर लोक काही दिवसानी तुम्हाला चप्पलांनी मारतील अशी टीका केली आहे.

सोलापूरच्या या जिल्हाध्यक्षावर तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्याला भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे. राजकारण्यांना आपण किती सन्मान दिला पाहिजे. त्यानंतर तो जर चुकतोय तर त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. तरच आपल्या घरातल्या मुली त्याच्या हातून वाचतील असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

या व्हिडिओत एक महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून – हमसून रडत स्वतःचे सनाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते नंतर बेडरूममधील डबल बेडवर बनियनवर बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे मोबाईलचा कॅमेरा करत म्हणते की, ‘हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,’ असे म्हणत असताना हा नेता तातडीने बेडवरून उठून पुढं येतो शुटींग करणाऱ्या महिलेची व त्यांची झटपट होताना दिसते. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!